“कंत्राटदार गायब “चक्क ४ मजुरांच्या भरोशावर सुरगाणा शहरातील मेनरोड परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या रस्त्याचे काम संथ गतिने सुरू
विजय कानडे
– सुरगाणा शहरातील मेनरोड परिसरातील कोट्यावधी रुपयाच्या निधीने मंजुर झालेल्या रस्ताचे काम फक्त ४ मजुरांच्या भरोवशावर चालु आहे.प्रबंधभुमीच्या बातमी नंतर रस्ताचे रखडलेले काम सुरु होऊन दहा ते पंधरा दिवस झाले पण या दिवसामध्ये फक्त रस्त्यावर दगड व मुरूम अाणुन टाकण्यात आला आहे तसेच.कंत्राटदाराच्या अनुउपस्थितीत दगड व मुरुम आला कसा त्याची रॉयल्टी काढली कोणी.असा प्रश्न मेनरोड परिसरातील सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
सुरगाणा नगरपंचायतच्या काही त्रुटी व दोष खालील प्रमाणे
कमी निविदा त्याला काम
रस्ते कामासाठी निविदा प्रसिद्ध केल्यानंतर ज्याची कमी रकमेची
निविदा येते त्याला नगरपंचायत काम देते .कोण हे काम देताना कंत्राटदाराचा पूर्वअनुभव ,आर्थिक स्थिती,त्यांच्याकडील साधन सामुग्री पाहणे आवश्यक असते.या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होते त्यामुळे नगर पंचायतच्या रस्त्याला दर्जाच नसतो.
निविदा अपूर्ण, अटी बेपत्ता
निविदा जाहीर करताना
नगरपंचायत त्रोटक माहिती देते .
निविदांमध्ये जोडपत्र अथवा इतर कोणताही तपशील नसतो .रस्त्याचे काम कसे करावे हे सांगितले जात नाही .उलट इतर ठिकाणी निविदा प्रसिद्ध करताना
रस्ते काम करण्याची पद्धत,गुणवत्ता नियंत्रण तक्ता, कामाची वेळोवेळी तपासणी अशा ५६ अटी व शर्ती असतात.या अटी, शर्तींना बांधील राहूनच काम करावे लागते.त्यामुळे ही कामे पण दर्जेदार होतात.पण येथे रस्ता कसा करायचा हे कंत्राटदारच ठरवतो .मग या रस्त्यांची वाट लागायला फार वेळ लागत नाही.
रस्ते खराब झाल्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु होते पण निधी पाण्यातच जातो.
डांबराचा दर्जा?
नगरपंचायतच्या कोणत्याही कामात जॉबमिक्स डिझाईनची सक्ती केली जात नाही.डांबराची प्रत बघितली जात नाही.कंत्राटदाराने कोणत्या प्रकारचा डांबर वापरला याची माहिती अधिकाऱ्यांना नसते. याचा गैरफायदा घेत कमी दर्जाचे डांबर फासुन रस्ता तयार केला जातो.असे रस्ते एका पावसात न वाहुन गेले तरच नवलच ! रस्ते कामासाठीचे डांबर सरकारी रिफायनरीतुन खरेदी करणे गरजेचे असते.रिफायनरीचा गेटपास बिलासोबत जोडणे आवश्यक असते. पण सुरगाणा शहरातील रस्त्यासाठी हे डांबर वापरात नसल्याने गेट चा पुरावा मिळणार कसा ?
कमिशनचे भागीदारच अधिक
एखादा रस्ता तयार करताना कंत्राटदार अनेकांना टक्केवारी देतो. निविदा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ही टक्केवारी सुरू होते . कर्मचारी, अधिकारी,लोकप्रतिनिधी या सर्वांसाठी त्याचे किमान पंधरा ते वीस टक्के जातात. नफा वगळता प्रत्यक्ष कामावर निम्मी रक्कम खर्च होते.परिणामी रस्ता दर्जेदार होत नाही.
सुरगाणा नगरपंचायतच्या अभाव असलेल्या काही गोष्टी
१)प्रत्येक कामाचे थर्ड पार्टी ऑडिट नाही.
२)गुणवत्ता चाचणी तक्ता नाही.
३)गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळा नाही
४)कार्यस्थळावर प्रयोगशाळा उभारणीचे निर्देश नाहीत.
५)उच्च दर्जाच्या कामासाठी कोणत्याही अटी नाही.
६)आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर अनिवार्य नाही
७)मूल्यमापनासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याचा प्रभाव
या सर्व गोष्टींकडे नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱयांनी लक्ष घातले पाहिजे.तसेच संथगतीने चालू असलेले मेनरोड परिसरातील रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे व रस्त्यासाठी लागणारे डांबर, खडी, मुरूम दगड चांगल्या प्रतीचे वापरावे.अन्यथा
रोजच्या रोज रस्त्याच्या कामाचा पाठपुरवठा केला जाईल.






