पंढरीतील संत पेठ परिसरातील घडशी समाजाला मनसेची मदत
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर शहरातील संत पेठ या परिसरामधील भजनी साहित्य दुरुस्ती करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या येथील घडशी समाजालाही लाॅकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून विविध भजनी वाद्य दुरुस्तीची कामे ठप्प आहेत. हाताला काम नसल्याने पंढरपूर शहरातील शेकडो कुटुंबे अडचणीत आली आहेत. अशा घ़डशी समाजातील गरीब व गरजू लोकांना आज मनसेेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने अन्न धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पंढरपूर हे आध्यत्मिक तीर्थक्षेत्र आहे. येथे पखवाज, तबला, वीणा, हार्मोणियम, ढोलकी, तंतुवाद्य आदींसह इतर भजनी वाद्याची निर्मिती व दुरुस्ती केली जाते. ही कामे घडशी समाज परंपरेने करत आला आहे. आषाढी,कार्तिकी, चैत्री आणि माघी यात्रेच्या निमित्ताने भजनी साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होती. शिवाय दुरुस्तीही केली जाते. भजनी वाद्य विक्री आणि दुरुस्ती व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल होते.परंतु कोरोनाचे संकट आल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून लाॅकडाऊन आहे. यामुळे भजनी वाद्य दुरुस्ती व्यवसाय पूूर्णतः बंद आहे. व्यवसाय बंद झाल्याने येथील घडशी समाजातील शेकडो कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. अशा वेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी घडशी समाजातील गरीब व गरजू लोकांना गहू, तांदुळ, साखर, आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. समाजातील सर्वच स्तरातील गरीब व गरजू लोकांना मनेसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे मदत करत आहेत. त्यांनी केेलेल्या या मदतीमुळे अनेक गरीब व गरजू लोकांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी मनेसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा मासाळ,उपाध्यक्ष महेश पवार, सागर घोडके,अोंकार कुलकर्णी, घडशी समाजाचे ज्ञानेश्वर जाधव, सागर जाधव, किशोर जाधव, औंदुंबर भोसले, अजय जाधव, माऊली जाधव, गणेश वाडेकर आदी उपस्थित होते.






