पंढरपुरातील डाॅक्टरांना मनसे तर्फे पीपीई किटचे वाटप
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर शहरातील कोरोना सारखे महाभयंकर संकट असतानाही पंढरपूर शहरातील अनेक डाॅक्टर लोकांची सेवा करत आहेत. आपला जीव आणि परिवार धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्या पंढरपुरातील काही डाॅक्टरांना त्यांच्या स्वसंरक्षणासाठी पीपीई किट देण्यात आले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी स्वखर्चातून हे पीपीई किट दिले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश आणि राज्यभरात लाॅकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे.
अत्यावश्यवक सेवेमध्ये सध्या डाॅक्टर आपल्या जीवाची परवा न करता, लोकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करत आहेत.कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी पीपीई कीट हे प्रभावी ठरले आहे. परंतु देशात व राज्यात पापीई किटची टंचाई असल्यामुळे सध्या अनेक डाॅक्टरांना ते मिळाले नाही. तरीही अनेक डाॅक्टर लोकांच्या सेवेत आहेत.पंढरपुरातील डाॅक्टरांची पीपीई किटची गरज ओळखून मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी स्वखर्चातून चांगल्या दर्जाचे पीपीई किट आज सेवा देणार्या डाॅक्टरांना मोफत दिले.पीपीई किटमुळे डाॅक्टरांना स्वतःचे कोरोनापासून संरक्षण करता येणार आहे. सामाजिक सेवा भाव ठेवून पीपीई किट वाटप केल्याने पंढरपूर शहरातील अनेक डाॅक्टरांनी दिलीप धोत्रे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपप्रमुख महेश पवार, अर्जून जाधव ,सागर घोडके, ओंकार कुलकर्णी, समाधान डुब लआदी उपस्थित होते.






