पंढरपुरातील पत्रकारांना दोन लाख रुपये विम्याचे कवच
मनसेचे नेत दिलीप धोत्रे यांचा पुढाकार
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर शहरामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे जगावर व आणि देशावर संकट ओढवले आहे. अशा संकटाच्या काळात देखील आपला जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक पत्रकार वार्तांकणाचे काम करत आहेत. अलीकडेच मुंबईतील काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा संकट काळात पत्रकारांवर दुर्दैवी प्रसंग ओढवला तर त्यांना आर्थिक मदत मिळावी या सामाजिक भावनेपोटी मनेसेेच प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी स्वखर्चातून पंढरपूर शहर व तालुक्यातील सुमारे 150 हून अधिक पत्रकारांचा दोन लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. पत्रकारांना विम्याचे कवच देण्याचा उपक्रम मनसेने राज्यात प्रथमच पंढरपुरात सुरु केला आहे.देशात आणि राज्यात कोरोनाची संख्या वाढू लागली आहे.
मुंबई,पुणे,सोलापूर या महानगरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. इतर भागात देखील कोरोनाची लागण होण्याची भिती आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आणि राज्यात लाॅकडाऊन करण्यात आला आहे. लोकांना घरात बसून कोरोनाची साखळी तोडण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. अशा परिस्थितीत देखील अनेक पत्रकार आपला जीव धोक्यात घालून माहिती पोचवण्याचे काम करत आहेत. मुंबई येथील अनेक पत्रकारांना कोरोनाची लागणी झाली आहे. त्यामुळे इतर शहर व भागातील पत्रकारांच्या जीवीताला देखील धोका निर्माण होऊ शकतो. अलीकडेच मनसेेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही सरकारने पत्रकारांचा विमा काढून त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. त्यानंतर येथील मनेसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी स्वखर्चातून पंढरपूर शहर व तालुक्यातील पत्रकारांचा विमा काढला आहे.
या विम्याची एक वर्षाची मुदत असून दोन लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. यामध्ये एखाद्या पत्रकाराचा मृत्यु झाल्यास 2 लाख 60 हजार रुपये, कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये आणि अपघातात जखमी झाल्यास वैद्यकीय खर्चासाठी 25 हजार रुपये असा लाभ मिळणार आहे.
मनेसेचे नेेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते आज काही पत्रकारांना विमा पाॅलीशीचे वितरण केले. यावेळी मनेसेेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपप्रमुख महेश पवार आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने पत्रकारांचा 50 लाखाचा विमा उतरावा
कोरोनाच्या संकट काळात देखील अनेक पत्रकार लोकांमध्ये जावून माहिती घेण्याचे काम करत आहेत.सरकारने पत्रकारांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करुन त्यांचा सरकारने 50 लाख रुपयांचा विमा उतरावा अशी मागणी ही या निमित्ताने मनसेेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे.






