Ahamdanagar

?️ जिल्हाबंदीत पारनेर तहसिलदार देवरे यांची खाजगी नाशिक सफर ! मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश.. देवरेंच्या कामातील चमकोगिरी उघड

जिल्हाबंदी असतानाही तहसिलदार देवरे यांची नाशिक सफर !
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देवरेंच्या कामातील चमकोगिरी उघड

पारनेर ः प्रतिनिधी -सुनील नजन

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदीसह संचारबंदी लागू केलेली आहे.या पार्श्वभूमीवर कोणालाही जिल्हा सोडून जाण्याची परवानगी नाही. त्यातल्या त्यात अधिकाऱ्यांना तर आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीत 24 तास आपल्या कर्तव्य पार पाडणे बंधनकारक आहे. अश्या परिस्थितीत पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी आपत्ती व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यंत्रयांचा आदेश झुगारून नाशीक वारी केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे !

जिल्हा बंदीचे आदेश जारी केल्यानंतर जिल्हयाच्या सिमा बंद करण्यात येउन येणा-या प्रवाशांना रोखण्याचे मोठे आव्हान शासनासमोर आहे. कारण नुकताच म्हणजे 22 मार्च रोजी संपुर्ण देशात लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पारनेर येथे दि. 28 मार्च रोजी विविध वाहनांनी पुणे, मुंबईवरून मोठया प्रमाणावर नागरीक येत होते. त्यांना रोखून जिल्हयात कोरोनाचा संसर्ग होउ नये याची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले होते. नगर पुणे महामार्ग, नगर कल्याण महामार्ग येथे चेक पोष्ट तयार करून पोलिस 24 तास निगराणी करून आपले कर्तव्य बजावत होते. अशा संपूर्ण परीस्थितीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तहसिलदार देवरे यांच्याकडे असताना देखील दि. 28 रोजी तालुका तसेच जिल्हयातील जनतेला वा-यावर सोडून देवरे या शासकिय वाहन घेउन नाशीकच्या खाजगी सफरीवर गेल्या.

दुस-या दिवशी त्या तालुक्यात प्रकटल्या या दरम्यान बेल्हे, जि. पुणे येथून अनेक वाहने तालुक्यात आली, काही तालुक्यातून जिल्हयाच्या विविध भागात गेली. त्याचे देवरे यांना सोईरसुतकही नव्हते. देवरे यांच्या या बेजबाबदार वर्तनाची तिखोल येथील धोंडीबा शेटे यांनी दखल घेउन शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची ठाकरे यांच्या कार्यालयाने गंभीर दखल घेत देवरे यांच्या या वादग्रस्त सफरीची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नागरीकांना घरात बसण्याचे आवाहन करणा-या तहसिलदारांनी स्वतःच जिल्हाबंदीच्या आदेशाचा भंग करून सोशल मिडीयावर त्या प्रसारीत करीत असलेल्या संदेश तसेच व्हिडीओ हा केवळ देखावाच असल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे.त्यांना सतत कामे न करता स्टंट बाजी करण्याची गाणे म्हणून लोकांची दिशाभूल करण्याची सवय आहे. कार्यालयीन काम न करता सतत प्रकाश झोतात कसे राहता येईल? याकडे विशेष लक्ष असते.आजपर्यंत अनेक ठिकाणी कार्य करत असताना त्या ह्याच पद्धतीने वागत आल्या आहेत.

?? टोलनाक्यांच्या कॅमे-यात शासकिय वाहन कैद
पारनेरहून नाशिककडे गेलेल्या तहसिलदार ज्योती देवरे यांचे सरकारी वाहन संगमनेर व सिन्नर येथील टोलनाक्यांच्या सीसी टीव्ही मध्ये जाताना व येताना कैद झाले आहे. आणिबाणीच्या स्थितीमध्ये देवरे यांना नाशिकला जाण्याची परवाणगी कोणी दिली ? नाशिकला जाताना शासकिय वाहन घेउन जाता येते का हा प्रश्‍न निर्माण झाला असून आता जिल्हाधिकारी त्यावर काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

?️ जिल्हाबंदीत पारनेर तहसिलदार देवरे यांची खाजगी नाशिक सफर ! मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश.. देवरेंच्या कामातील चमकोगिरी उघड

संगमनेर – पारनेरहून नाशिककडे जाणारे व नाशिकहून पारनेरकडे परतणारे तहसिलदार ज्योती देवरे यांचे शासकिय वाहन संगमनेर येथील टोल नाक्याच्या सीसी टीव्ही मध्ये कैद झाले आहे.

अमळनेर येथे कार्यरत असताना देखील अधिकार पदाचा दुरुपयोग करणे,कोणाला ही गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणे किंवा खोटे गुन्हे दाखल करणे ,अरेरावी ने बोलणे,गाणे म्हणून लोकांचे मनोरंजन करणे, उच्च शिक्षित,विभूषित शिक्षक,मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य यांना निवडणूक काळात अद्वा तद्वा बोलणे,अपमान करणे,अक्कल काढणे इ पदाला न शोभणारी कृत्ये त्यांनी केली आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button