फेसबुकवरुन अफवा पसरविनाऱ्या विरूद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल.
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि.०७
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करता नागरीकांमध्ये भीती निर्माण होईल अशी खोटी अफवा फेसबुक वर पोस्ट करणाऱ्या अजित धन्यकुमार काकडे, रा. दहिटना, ता. परंडा याच्यावर दि ७ रोजी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
अजित काकडे याने दि ७ एप्रिल रोजी त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन नोटा जमिनीवर विखुरलेल्या असलेला एक छायाचित्र प्रसिध्द केले. या सोबत ‘रस्त्यावर किंवा आपल्या आजुबाजूला पडलेल्या अशा नोटांना हात लाउ नका, कदाचीत या नोटा जाणीवपुर्वक थुंकी लाउन कोरोना विषानुचा फैलाव करण्यासाठी रस्त्यावर टाकल्या जाउ शकतात.’ असे निवेदन (पोस्ट) प्रसिध्द केले.
यावरुन समाजात भय निर्माण होईल अशी अफवा पसरवल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, 505 (2) अन्वये गुन्हा दि. ७ रोजी नोंदवण्यात आला असुन सायबर पो.ठा. मार्फत तपास केला जात आहे.
अफवा पसरविनाऱ्या , सामाजीक व धार्मीक तेढ निर्माण होईल असे कोणतीही पोस्ट सोशल मिडीयावर कोणीही पोस्ट करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा उस्मानाबाद च्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी दि. ०६ रोजी दिला होता






