तळेगावला 50 लाखाची पाणी योजना धूळखात ठेकेदाराची मनमानी;
आठ दिवस आड होतोय पाणीपुरवठा. ग्रामस्थ टाकीच्या प्रतीक्षेत
डॉ गजानन जाधव
तळेगाव ता. जामनेर दि. १४ येथे ५० लाख रुपये निधीतून मुख्यमंत्री पेजल योजनेअंतर्गत होत असलेले जलकुंभाचे काम रखडले आहे. गेल्या दोन वर्षापासून हे काम होत आहे. त्यामुळे गावात आठ दिवसात आड पाणीपुरवठा होत आहे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गावात वाकडी धरणातून पाणी उचल करून पाणीपुरवठा केला जातो यासाठी अगोदरच्या पाणीपुरवठा योजनेत तेव्हाच्या लोकसंख्येनुसार ५३हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र आता लोकसंख्या वाढली असून गावाचा मोठा विस्तार झाला आहे यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून एक लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभ उभारणी नुतन पाईप लाईन आणि पंपासाठी मुख्यमंत्री पेजल योजनेतून ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला गेल्या दोन वर्षापूर्वी या कामाला सुरुवात झाली खरी मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही जुन्या जलकुंभांची साठवण क्षमता कमी आहे तसेच त्याची पाईपलाईन ही जीर्ण झालेली असल्याने गावात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो धरणात पुरेसा जलसाठा असतानाही ग्रामस्थांना मात्र ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
तळेगाव येथील मुख्यमंत्री पेजल योजनेची मुदत आक्टोबर महिन्यात संपली आहे आतापर्यंत जलकुंभतून पाणीपुरवठा व्हायला पाहिजे होता मात्र अद्याप काम अपूर्ण आसल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही काम पूर्ण करण्याबाबत लेखी समाज देऊन सहा महिने मुदत वाढ ठेकेदाराला दिलेली आहे काम पूर्ण न केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा शालिग्राम चव्हाण ,शाखा अभियंता जळगाव यांनी केली आहे.
*ठेकेदारावर कारवाईची मागणी*
गेल्या दोन वर्षापासून योजनेचे काम अपूर्णच आहे या कामाकडे ठेकेदार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ सरपंच सविता माळी यांच्यावर रोष व्यक्त करीत आहे ठेकेदार निथुन ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच काम पूर्ण करणार पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होणे पाईपलाईन त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे तरी संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून मुख्यमंत्री पेजल योजनेचा कामात गती देण्याची ग्रामस्थांची मागणी होत आहे.






