किल्लारी येथील ३० खेडी पाणीपुरवठा चालू करण्याची शिवसेनेची मागणी
प्रशांत नेटके
किल्लारी प्रतिनिधी:- औसा तालुक्यातील किल्लारी हे गाव सुमारे ३० हजार लोकसंख्येचे गाव आहे.किल्लारी येथील ३० खेडी पाणीपुरवठा तब्बल चार ते पाच महिन्यापासून बंद आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यापासून किल्लारीस निम्न तेरणा धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे पाणीपुरवठा वितरित होत नाही.त्यामुळे किल्लारी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
जीवनावश्यक गरज असतानाही किल्लारी ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या प्रश्नावर स्थानिक स्तरावर वारंवार निवेदन देण्यात आले; परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. ग्रामस्थांवर भटकंतीची वेळ वारंवार येत असल्याने हा प्रश्न तात्काळ सोडवावा आणि किल्लारी गावास कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्यात यावी अशी मागणी औसा तालुका शिवसेनेचे समन्वयक किशोर जाधव यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.






