महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उध्दवजी ठाकरे यांची माजी आमदार ज्ञानेश्वर ( तात्या ) पाटील यांनी विधान भवन मुंबई येथे घेतली भेट
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
परंडा ( सा.वा ) दि. २७
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय श्री उध्दवजी ठाकरे यांची धाराशिव जिल्हाचे राजकारणातील किंगमेकर व उद्धवजी ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू समजले जाणारे माजी आमदार श्री ज्ञानेश्वर ( तात्या ) पाटील यांनी विधान भवन मुंबई येथे भेट घेतली.
परंडा तालुक्यातीलच नव्हे तर धाराशिव जिल्हाच्या गोरगरीबांच्या समस्याचे निवारण हे फक्त ज्ञानेश्वर तात्या पाटीलच करू शकतात असा जिल्हातील गोरगरिबापासुन ते श्रीमंता पर्यत विश्वास आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर (तात्या ) पाटील हे दोन वेळा शिवसेना पक्षाचे आमदार होते. यांना भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसवरच नव्हे तर घरी, शेतातील बंगल्यावर अलोट गर्दी जमत असते. लोकांना त्यांच्या घरी गेल्यावर मिनी मातोश्रीवर गेल्यासारख वाटत,त्यांना जिल्हा तच नव्हे तर पक्षात देखील खुप वजनदार व्यक्तीमत्व समजल जात.
परंडा विधानसभा मतदारसंघात त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना स्थापन केली होती म्हणून जर मतदार संघात पाहिल्यांदा शिवसेनेच नाव घेतल तर ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचच नाव घेतल जात. लोकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवतात, त्याच निवारण करतात दिवसरात्र लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यामुळे त्यांना किंगमेकर या नावाने संबोधले जाते. माजी आमदार असले तरी आजी आमदाराला भारी आहेत.
यावेळी विधानभवन मुंबई येथे माआमदार ज्ञानेश्वर (तात्या ) पाटील, जैन संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जयकुमार जैन, वाशीचे चेडे आदी उपस्थित होते.