यात्रा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर कानिफनाथ गडावर महाराष्ट्रातील पहिली होळी पेटली
सुनिल नजन
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्ष्रेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांचा यात्रा महोत्सव दि.९ ते २५ मार्चपर्यंत संपन्न होत आहे. त्या निमित्ताने कानिफनाथ गडावर सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक पाथर्डी-शेवगावचे प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत यात्रा काळात येणाऱ्या लाखो भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते, विज,पाणी, कायदा व सुव्यवस्था, अवैध धंदे,सार्वजनिक फिरते सौचालय,वाहतूक व्यवस्था, यात्रेकरूसाठीच्या सर्व उपाय योजनावर आराखडा तयार करण्यात आला.तो योग्य प्रकारे पार पाडू अशी ग्वाही सर्व अधिकाऱ्यांनी दिली.या बैठकीस शेवगावचे पोलिस उप अधिक्षक मंदार जवळे,पाथर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, तहसीलदार नामदेव राव पाटील, बीडीओ सुधाकर मुंडे,कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर राजळे,मुख्याधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड,डॉ. लाखुळे, सतिश पाखरे,देविदास मरकड, सुभाष मरकड,बबन मरकड,पो.हे.काँ. हरीभाऊ दळवी,पो.काँ. वैद्य,चंद्रकांत भराटे हे उपस्थित होते.
रात्री ९ वाजता गडावर ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी पेटवन्यात आली. या सणाला भट्टीचा सण म्हणतात.






