Pandharpur

द.ह.कवठेकर प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

द.ह.कवठेकर प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर शहरातील वर्षभर प्रशालेत भाषा, कला व क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी व हिंदुस्थान एरोनॉटिक रिसर्च व डिझाईन सेंटर बेंगलोरचे तांत्रिक व्यवस्थापक श्री.उमेश शिंदे व इतिहास अभ्यासक श्री.तुकाराम चिंचणीकर होते. प्रशालेच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाचे सर्व निवेदन विद्यार्थ्यांनीच केले. कु. ईशीता सावळे हिने प्रास्ताविक, कु.रूही तेंडुलकर व कु.अनुष्का वाडेकर ह्यांनी अभ्यागतांचा परिचय केला. तर प्रशालेच्या वार्षिक अहवालाचे वाचन चि. स्वरूप दिवाण व कु.गायत्री रेपाळ यांनी केले. राष्ट्रीय थाळीफेक स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त खेळाडू कु.पल्लवी काळेल व सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थिनी कु.वैष्णवी लेंगरे यांना याप्रसंगी द.ह.क.भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष भागवताचार्य वा.ना.महाराज उत्पात सर यांना पुणे येथील प्रतिष्ठित श्रीमंत नानासाहेब पेशवे आध्यात्मिक व सामाजिक पुरस्कार मिळाल्या बद्दल प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. देशभक्तीपर गीतांचा आविष्कार असलेला गीतमंच विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रारंभी प्राचार्य श्री.प्र.गो.डबीर सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. उपप्राचार्य श्री.द.शि. तरलगट्टी व पर्यवेक्षक श्री.वि.या.पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अशोक आवताडे, सहसचिवा सौ.अनिता बागल तसेच पालक ,व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थींनी कु.ईश्वरी मुडेगावकर हिने तर आभार चि. चिन्मय खिस्ते यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button