घोटण येथिल पांडवकालीन मल्लिकार्जुनेश्वराचा महाशिवरात्री निमित्त यात्रा महोत्सव संपन्न
सुनील नजन
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण येथे महाशिवरात्री निमित्ताने मल्लिकार्जुनेश्वर यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.महादेव महाराज घुगे यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवस शिवकथा वाचन,आणि तीन दिवस शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज डांगरे यांच्या काल्याच्या किर्तनाने व पाच क्विंटल खिचडीच्या महाप्रसादाच्या वाटपाने या सोहळ्याची सांगता झाली. या पाच दिवसाच्या काळात काकडा भजन,वाचन,किर्तन,जलाभिषेक,आरती, महाराष्ट्रातील नामवंत मल्लांचा कुस्त्यांचा जंगी हंगामा असे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या हस्ते कुस्ती विजेत्या मल्लांना बक्षीस वितरण करण्यात आले. मल्लिकार्जुनेश्वर मल्टीस्टेट निधीचे चेरमन संजय मोटकर सर यांच्या हस्ते सर्व मांन्यवरांचा सन्मान करण्यात आला.दामूआण्णा घुगे,शिवाजी टाकळकर, अर्जुन नाना निकम,गणेश निकम,लक्ष्मण टाकळकर, सर्जेराव ढाकणे,रेवण भोसले,भारत निकम,प्रशांत थोरवे,सुभाष मोटकर,महादेव मोटकर, देविदास घुगे,महादेव बन,विठ्ठल मोटकर, नामदेव घुगे, यांनी विशेष सहकार्य केले.हा यात्रा महोत्सव पांडवांच्या काळापासून आजपर्यंत अविरतपणे सुरु आहे. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर






