प्रवाशाकडून ऑटोचालकावर चाकूहल्ला ऑटोचालक गंभीर जखमी
किल्लारी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखलऔसा प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळेऔसा तालुक्यातील थरारक घटना दिनांक15 फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लामजना पासुन जवळच असलेल्या जुने लामजना उत्का पाटीजवळुन फिर्यादी अॅटो चालक जितेंद्र माणिक साठे रा.लामजना हे दोन प्रवाशासह लामजना ते लाडवाडीचे भाडे घेवुन जात असताना झालेल्या प्रवासाचे भाडे कमी करण्याच्या कारणावरून प्रवासी आरोपी नामे विकास भगत तौर यांनी अॅटो चालकास तु जास्त भाडे का घेतोस ? म्हणुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली म्हणुन अॅटो चालकाने त्यास शिवीगाळ करु नको असे म्हणाले असता ,सदर आरोपीने त्याच्या कडे असलेल्या बॅग मधुन चाकु बाहेर काढुन चालकाच्या पोटावर सपासप वार केले, त्यानंतर चालकाने हात पुढे केला हातावर सुद्धा चाकुने वार केला, यात अॅटो चालकाचे पोटावर व हातावर वार करून जखमी केले आहे घटनेची माहिती किल्लारी पोलिसांना कळवले असता, त्यानंतर घटनास्थळावर पोलीस लागलीच हजर होवुन आरोपीस ताब्यात घेतले व जखमीला जिल्हा रुग्णालय लातुर येथे पाठविले.
पोलीसांकडुन मिळालेली माहिती अशी की यातील आरोपी विरुध्द पुणे शहरात अनेक गुन्हे दाखल असुन , सदरचा गुन्हेगार हा पुणे शहरातुन हद्दपार असल्याचे पोलीस सूत्रांकडून माहिती मिळतेय






