Paranda

कै. जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या सामूहिक विवाह सोहळ्याचे १२१ जोडी जोडपी विवाहबद्ध

कै. जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या सामूहिक विवाह सोहळ्याचे १२१ जोडी जोडपी विवाहबद्ध

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि.१६

कै. जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या सामूहिक विवाह सोहळ्याचे १२१ जोडी जोडपी विवाहबद्ध झाली.सावंत यांचा महाराष्ट्रातील स्तुत्य उपक्रम संपन्न परंडा तालुक्यातील सोनारी येथे भैरवनाथ कारखान्याच्या भव्य असा कै. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना अंतर्गत कै. जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केलेल्या २० व्या सर्वधर्मीय सोहळ्यात दिनांक १६रोजी दुपारी १ : ३१ मिनिटानी गोरख मुहूर्तावर १२१ जोडपी विवाहबध्द झाली

कै. जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या सामूहिक विवाह सोहळ्याचे १२१ जोडी जोडपी विवाहबद्ध

सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत व प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी राजकारणाचा वसा घेतल्यानंतर २०टक्के राजकारण ८oटक्के समाजकारण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे आपण काहीतरी देणे लागतो या कृतीप्रमाणे कार्य करण्यास सुरुवात केली सामुदायिक विवाह सोहळा वीस वर्ष पूर्ण झाली असून धाराशिव, सोलापूर या दुष्काळी जिल्ह्यातील गोरगरिबांच्या वंचित वर्गातील मुला मुलींचे संसार उभे करून दिले असून महाराष्ट्रातील आदर्श समाज विवाह सोहळा नावलौकिक मिळाला आहे .सावंत प्रतिष्ठान च्या विवाह सोहळ्यातील वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी शिवसेनाप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे उपस्थित राहणार होते परंतु काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला तर या शुभमुहूर्तावर प्रसंगी महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर माजी आमदार सुजित ठाकूर आमदार राणा पाटील खासदार ओमराजे निंबाळकर आमदार शहाजी पाटील यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरांना यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार नारायण आबा पाटील आमदार लक्ष्मण जगताप शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके, दत्ता साळुंखे ,अण्णासाहेब जाधव भाजपचे तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील नगरसेवक मकरंद जोशी गायकवाड विठ्ठल पाटील नगरसेवक मकरंद जोशी अब्बास मुजावर बाबासाहेब गायकवाड महादेव शामराव मोरे अनिल देशमुख आदीसह सावंत परिवारातील शिवाजी सावंत आणि सावंत धनंजय सावंत, पृथ्वीराज सावंत सावंत उपस्थित होते या विवाह सोहळ्यासाठी सेलिब्रिटी म्हणून मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव चित्रपट अभिनेत्री प्रार्थना बेहरे मराठी मालिका अभिनेता किरण गायकवाड संभाजी मालिकेतील महाराणी येसूबाई प्राजक्ता गायकवाड हे उपस्थित होते.

कै. जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या सामूहिक विवाह सोहळ्याचे १२१ जोडी जोडपी विवाहबद्ध

विवाह सोहळ्यासाठी भैरवनाथ कारखाना वर भव्य दिव्य असा मंडप उभारण्यात आला होता वधू-वरांच्या शामीयाना ची खास व्यवस्था करण्यात आली होती सोहळ्यात वधु-वरांसाठी कपडे ,मणी-मंगळसूत्र ,आणी संसारोपयोगी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने दिले गेले आहे.कारखाना स्थळी दक्षिण बाजूला तिन लाख वऱ्हाडी मंडळीची जेवनाची व्यवस्था पुरुषासाठी वेगळी , स्त्रियासाठी वेगळी अशी करण्यात आली आहे. पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था होती. तगडा पोलीस बंदोबस्त होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button