शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सोलापूर विभागीय जिल्हाउपाध्यक्षपदी अविनाश विठ्ठल शिरसाट यांची निवड
प्रतिनिधी रफिक आत्तार
शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेची आज उत्तर सोलापूर येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती.या मिटींगमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील युवक युवती आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणात आली.यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे व सोलापूर विभागीय जिल्हाध्यक्ष विजयकुमार साठे यांच्या अध्यक्षतेखाली आपण जनसामान्यांचे,अपंग,मूकबधिर,शेतकरी,कष्टकरी, शेतमजुर, विद्यार्थी व विद्यार्थीनी,बेरोजगारांना न्याय मिळवून दिला जाईल,सर्व प्रश्न सोडवले जातील.असे म्हणाले यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान संघटनेच्या उत्तर सोलापूर विभागीय जिल्हाउपाध्यक्षपदी अविनाश विठ्ठल शिरसट एकमतानी निवड करण्यात आली. यावेळी निवडचे पत्र देताना शिवबुध्द संघटनेचे सोलापूर विभागीय जिल्हाध्यक्ष विजयकुमार पांडूरंग साठे,पंचायत समिती सदस्य सुधीर गोरे,शशी सलवदे, प्रविण लबडे, सरपंच शेवालाल नगर लक्ष्मण राठोड,शिवसेना विभाग प्रमुख बजरंग देवकर, यांच्या आदेशखालील पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी शैलेश चवरे समाधान चवरे,किशोर चिकणे, ॠषी घाटे,प्रकाश गोसावी, गणेश पवार,लखन साळी,इत्यादी उपस्थित होते.






