Pandharpur

पंढरपूर जिजामाता उद्यानाला कोणी वालीच नाही.नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष… अनेकांच्या आत्महत्येचे उद्यान बनले ठिकाण

पंढरपूर जिजामाता उद्यानाला कोणी वालीच नाही.नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष…
अनेकांच्या आत्महत्येचे उद्यान बनले ठिकाण

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर दि 8पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भरगच्च गर्दीचे आणि रहदारीचे असणारे ठिकाण म्हणजे शिवाजी चौक याच शिवाजी चौक ठिकाणी असणारे पंढरपूर नगरपरिषद संचलित जिजामाता उद्यान या उद्यानातील सध्या लहान बालकांसाठी असणारी खेळणी उदाहरण घसरगुंडी झोपाळा आकर्षक असणारे रंगीबेरंगी पाण्याच्या कारंजा तसेच लहान बालकांची उद्यानांमध्ये सफर करणारी रेल्वे बाबा गाडी मोडकळीस आल्याने सध्या तरी कोणी या उद्यानाला वाली नाही असे दिसत आहे.

या उद्यानातील सर्व वस्तू पैकी घसरगुंडी झोपाळे आणि मल्लखांबाची तोडफोड तर या ठिकाणी आकर्षक असा पाण्याच्या कारंजा असणार हौद हा बंद असून मोडकळीस आलेला आहे एवढेच नव्हे तर शहरातील बालबच्चे ज्या आनंदाने झुक झुक करीत थोडा वेळ का होईना आनंद लुटत होते ती रेल्वे सध्या एका उद्यानाच्या कोपर्‍यातील जागेत बंद अवस्थेत मोडतोड होऊन तिच्या भोवताली काटेरी झाडाझुडपांनी व्यापलेले असल्याने दिसेनाशी झाली असल्याने की आता केवळ भंगारात जमा करण्याची वेळ आली आहे येथील जिजामाता उद्यान असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था दिसून येत आहे.

उद्यानातील झाडाझुडपांनी लावण्यात आलेले ट्री गार्ड जाळ्यांची तूट फूट झाले असून काही लोकांनी तर उद्यानाच्या कंपाउंड ची भिंत फोडून येणे जाण्यासाठी जागा करून अनेक उद्यानातील सामान गायब केल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी दुपारी चार ते आठ या वेळेत असणाऱ्या येथील काही लोकांना याबाबत माहिती असूनही डोळ्याला काळी पट्टी कानावर हात आणि तोंडावर बोट ठेवून आमची तुमची असल्याने नगरपरिषदेचे उद्यान संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ही आळीमिळी गुपचिळी बाळगून गप्प राहिल्याचे दिसत असले बाबत काही बघणाऱ्या नागरिकातून चर्चा सुरू आहे बरेच दिवसापासून या उद्यानाकडे एकाही नगरसेवकांचे व नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांचे लक्ष नसल्याने कोणी उद्यानाची कंपाउंड बीज फोडून आतील सामान गायब करीत आहेत तर कोणी या ठिकाणी जाऊन आत्महत्या करण्याच्या घटनाही घडत आहे.

पंढरपूर जिजामाता उद्यानाला कोणी वालीच नाही.नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष... अनेकांच्या आत्महत्येचे उद्यान बनले ठिकाण

काही दिवसांपूर्वीच या उद्यानांमध्ये एका इसमाने जाऊन आत्महत्या केली होती हे सर्वांनाच ज्ञात आहे अशा अनेक वेळा घटना घडतात त्या केवळ नगर परिषदेच्या आणि नगरसेवकांच्या दुर्लक्ष पणा मुळेच होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या म्हणून ऐकण्यात येत आहे.
या उद्यानामध्ये बऱ्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य म्हणजेच कचरा मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्यामुळे स्वच्छते चा अभाव दिसत असल्याने पंढरपूर शहरवासीयांनी आणि पंढरीत येणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी भक्तांनी पंढरीच्या उद्यानाची अवस्था बघून स्वच्छ पंढरी सुंदर पंढरी म्हणण्याऐवजी गल्लीत पंढरी कचरा पंढरी म्हणावे अशी उद्यानांची अवस्था झाली आहे हे उद्यान बघण्यासाठी मात्र नगर परिषदेने प्रति माणसाचा एक रुपया तिकीट दर आकारला असून उद्यानात लोकांना पिण्याचे पाणी आहे का ठिकाणी कचरा तोडफोड झालेल्या वस्तू हे बघण्यासाठी आमचे शहरातील लोक पालक एक रुपये तिकीट देऊन बघून येतात हीच आमच्या पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यान का? असा प्रश्न स्थानिक नागरिकातून भेडसावत आहे. या सर्व गोष्टीवरून पंढरपूर नगरपरिषद अधिकारी व शहरातील सर्वच नगरसेवकांना ही वाईट अवस्था बघून शरमेने मान खाली घालावी लागेल यात मात्र शंकाच नाही.

या जिजामाता उद्यान ठिकाणी न सेक्युरिटी गार्ड ना, कर्मचारी या बाबतीत सर्वांचेच आहे दुर्लक्ष.. म्हणूनच जिजामाता उद्यानाला नाही कोणी वाली हे मात्र सत्य आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button