Pandharpur

माघी वारीत आरोग्य विभागा कडुन करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेण्यात आला

माघी वारीत आरोग्य विभागा कडुन करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेण्यात आला

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर व विविध भागात नेमलेल्या मुकदम यांच्या समवेत वारी काळात आरोग्य विभागा मार्फत करण्यात येणाऱ्या कामाची पाहणी करण्यात आली. दर्शन मंडप, पत्रा शेड, मंदीर परिसर, ,वाळवंट, ६५ एकर या भागाची पाहणी करण्यात आली.

माघी वारीत आरोग्य विभागा कडुन करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेण्यात आला

आरोग्य विभागाने चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे पाहीले. विवीध प्रकारच्या, विवीध ठिकाणी समस्या निर्माण होत होते पण त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येत होत्या. जलद रितीने कचरा उचलण्यात यावा यासाठी शक्य असेल त्या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी जेसीबी व टिपरच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली व इतर ठिकाणी कर्मचारी कडुन कचरा उचलण्यात आला. देवळा नजीक इंदिरा गांधी भाजी मंडई येथे कचरा खुप साचल्याने या गर्दिच्या, वर्दळीच्या भागात पहिल्यांदाच नियोजनाने जेसीबी व टिपरच्या सहाय्याने गुरुवारी कचरा उचलण्यात आला.
गुरुवार व शुक्रवारी बऱ्यापैकी कचरा उचलण्यात आला, राहिलेली थोड्याभागातील स्वच्छता अल्पवधीत पुर्ण करण्यात येईल.

माघी वारीत आरोग्य विभागा कडुन करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेण्यात आला

सर्व प्रकारच्या स्वच्छता संदर्भात नेमलेल्या मुकादमाने स्वत: आढावा ध्यावा असे सांगितले. पोर्णीमे परियंत गाव भागात वर्दळ असल्याने अशाच जोशने काम करुन भावीकांस चांगल्या सुवीधा पुरवण्यात याव्यात अशा सुचना सभापती विवेक परदेशी यांनी दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button