सुरगाणा पंचायत समिती समोर ब’ व “ड”घरकुलासाठी DYFIसंघटनेच्या वतीने बेमुद्त उपोषण
विजय कानडे
सुरगाणा तालुक्यात सण २०१९पासून प्रधानमंत्री घरकुल आवास योजना “ब”यादिसाठि काही लाभार्थ्यांची निवड होवून त्यांना घरकुल निधीचा पहिला हप्ता शासनामार्फत मोजक्या लाभार्थ्यांना मिळाला असून आणि पुढील हप्ता तात्काळ मिळेल या हिशेबाने लाभार्थ्यांने पैश्याची जमवा-जमव करून आणि घर पूर्ण करून अद्यापही या घराचे बिल लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने संबंधित प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असल्याने सुरगाणा तालुका डीवाय एफ आय च्या वतीने सुरगाणा गटविकास अधिकारी या (BDO)या कार्यालया समोर बेमुदत उपोषण केले आहे यात संबंधित प्रशासनाने दोन वर्षापूर्वी *ड* यादी तयार करण्याचे आदेश शासनामार्फत प्रत्यक पंचायतीस दिले होते परंतु या *ड*यादीची येत्या दोन वर्षापासून कुठल्याही प्रकारची अमलबजावणी झाली नाहि व त्या यादीचे कुठल्याही प्रकारे ऑनलाईन सादरीकरण करण्यात आलेले नाहि या प्रलंबित पडलेल्या घरकुलाचा खुलासा करण्यासाठी हे बेमुदत उपोषण केले आहे आणि या उपोषणाची दखल जर संबंधित प्रशासनाने घेतली नाही तर येत्या दोन दिवसात यादीतील सर्व लाभार्थ्यांचा मोर्चा काढून पुढील दिशा ठरविली जाईल असा इशारा देविदास हाडळ, नितीन गावित, राहुल गावित, सुभाष भोये, हिरामन वाघमारे,राहुल आहेर सुरेशभाऊ गवळी, सुकलाल मोहिते, पांडुरंग गायकवाड, आदींनी दिला आहे.






