कंटनेर ट्रकखाली चिरडून परंडा शहरात एक जण जागीच ठार
सुरेश बागडे
परंडा ( सा.वा ) दि. ०५परंडा शहरात कोर्टाच्या समोर शिवाजी चौकात बार्शी रोडवर कंटेनर ट्रकने पायी चालत असणाऱ्या इसमास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली हा अपघात बुधवार दि . ५ फेब्रुवारी दुपारी ११ . १५ च्या सुमारास घडला .
याबाबत परंडा पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी की परंडा येथील रहिवाशी मुस्तफा ऊर्फ मुसा बाबा शेख वय ६० वर्षे मोमीन गल्ली परंडा हे शहरातील शिवाजी चौकात पायी फिरत असताना समोरून आलेल्या कंटेनर ट्रक क्र . MH 04 FJ 3522 च्या चालकांनी त्याच्या ताब्यातील वाहण हे हयगयीने निष्काळजीपणे व भरधाव वेगात तसेच रस्त्याच्या परिस्थीकडे दूर्लक्ष करुन समोरून येवून त्याच्या अंगावरून कंटनेर ट्रक घालून जोराची धडक दिली त्यात मुस्तफा ऊर्फ मुसा बाबा शेख हे गंभीर जख्मी होऊन जागीच ठार झाले .मयताचे नातेवाईक रुक्साना फारूख शेख वय ३५ वर्ष यांच्या फिर्यादीवरून कंटनेर क्र . एम.एच. ०४ एफ जे ३५२२ चा चालक यांच्यावर परंडा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
पुढील तपास सपो नि. साहेबराव राठोड हे करित आहेत
शहरातील वर्धळीच्या ठिकाणी भर चौकात अपघातात एका गरिबाचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे तर आता तरी भर चौकातील अतिक्रमणे बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन हटविणार काय ? का अजून किती जणाचा बळी जाण्याची वाट पाहणार अशी संतप्त प्रतिक्रीया नागरिकातून उमटत होती .