जि प प्रा शाळा वाकडीचे शिक्षक यांच्या कडून संकटग्रस्त शेतकऱ्याला मदत
सुरेश बागडे
परांडा (सा.वा ) दि. ०५
वाकडी येथील शिक्षक श्री नलवडे यु डी यांनी अपसिंगा येथील शेतकरी श्री बब्रूवान राऊत यांची द्राक्षे फळाबागेचे नुसकान झाल्यामुळे त्यांना १५०००रु मदत केली
आपण शेतकऱ्याचे देणे आहोत या भावणेने परांडा तालुक्यातील वाकडी येथील शिक्षक नलवडे सर यांनी २६ जानेवारी प्रजाकस्ताक दिना निमित्त औचित्य साधून आपसिंगा येथील शेतकरी राऊत यांची दाक्षेबाग फळांनी बहारली असताना अज्ञात इसमाने बुडातुन कापून नुसकान केले होते , हे नुस्कान पाहून महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात हळहळ निर्माण झाली होती तेव्हा टेलव्हीजनवर , व्हॉटसपवर या बातमी मोठया प्रमाणात झळकू लागली ही बातमी पाहून वाकडी येथील शिक्षक नलवडे सर यांनी अपसिंगा गावी जावून पुर्ण बागेचे पाहणी केली या शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुसकान झाले होते तेव्हा नलवडे सर यांनी शेतकरी श्री बब्रवान राऊत यांचे सांत्वन केले व आपण कुठेतरी शेतकऱ्याचे देणे लागतो या उद्धेशाने फुल नाही फुलाच्या पाकळीच्या मदतीचे आश्वासन देवून आले.
प्रजाकस्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी जि प प्रा शाळा वाकडी येथे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवण्यात आले ध्वाजारोहण झाल्यावर त्यांना लहान मुलांच्या हास्ते पंधरा हजार रोख रक्कम पुष्पगुछ देण्यात आला.
गावातील शेतकरी , ग्रामस्थ महिला वर्ग मोठया प्रमाणात उपास्थित होता अशा दानशूर शिक्षकाचे तालुक्यातुन कौतुक होत आहे
( महाराष्ट्रातील माणुस नेहमीच इतरांना मदत करण्यात अग्रेसर राहिला आहे विदयार्थीनाही संकटसमयी इतरांना मदत करावी हा संस्कार त्यांच्या मनात रुजविता आला याचे खूप समाधान वाटते.असे मत व्यक्त केले आहे.






