सरकारी कामात हलगर्जीपणा करून विरोधीमाझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देत असेल तर त्यांची कोणत्याही प्रकारची गय करणार नाही – उर्जा, आदिवासी, नगरविकास मंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे
सुनील नजन
सरकारी कामात हलगर्जीपणा करून विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून माझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देत असेल तर त्यांची कोणत्याही प्रकारची गय करणार नाही असा ईशारा उर्जा, आदिवासी, नगरविकास मंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे यांनी जिल्हा परिषद. पंचायत समिती, जिल्हा सहकारी बँक, वांबोरी पाईपलाईन योजनेच्या अधिकाऱ्यांना दिला.ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे आशिर्वाद मंगल कार्यालयात २९गावाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी सत्कार समारंभा प्रसंगी बोलत होते.
मीरी जिल्हा परिषद गटाच्या वतीने मा.जि.प.सदस्या सौ.उषाताई कराळे,जेष्ठनेते राजुमामा तागड,सुभाष गवळी उद्धव दुसंग यांनी सन्मान केला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सभापती व विद्यमान सरपंच काशिनाथ पाटील लवांडे हे होते.प्रथमदर्शनी पिण्याच्या पाण्याची वांबोरीचारी, टप्पा क्रमांक दोनची व्यवस्था करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी संभाजी पालवे, मोहनराव पालवे,शिवशंकर राजळे,संभाजी वाघ,बाबा पुढारी,चंद्रकांत म्हस्के यांची भाषणे झाली.ना.तनपुरे पुढे म्हणाले की माझ्या मंत्रीपदाचा वापर कोणाची जिरवा जिरवी करण्यासाठी नाही तर सर्व सामांन्य जनतेच्या विकास कामासाठी करणार असल्याचे सांगितले.पाथर्डी तालुका पत्रकार संघाच्या वतीने अँड. हरीहर गर्जे,अशोक मोरे,सुनिल नजन,सचिन नंन्नवरे,सोमनाथ बोरुडे, मतीन मन्यार,यांनी सत्कार केला. यावेळी बाबासाहेब भीटे,विजय टापरे,अशोक कदम,धिरज पाणसंबळ,संजय लवांडे, अविनाश नरवडे,भाऊसाहेब लवांडे,बी.डी.ओ सुधाकर मुंढे,अनिल रांधवने,ऊपस्थीत होते. पाथर्डी पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, सपोनि परमेश्वर जावळे,पो.काँ.वैद्य, हवालदार दळवी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.






