Chopda

एनीटाईम इंडिया न्युजच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन.

एनीटाईम इंडिया न्युजच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन.

चोपङा ( जिल्हा जळगाव )येथील एनीटाईम इंडिया न्युज या इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या वतीने दिनदर्शिकेचे लोकार्पण पत्रकार दिनाचे अवचित्य साधून दि ६ जानेवारी रोजी करण्यात आले. सत्रासेन येथील सरपंच सौ वंदनाताई भादले यांच्या हस्ते सत्रासेन येथील धनाजी नाना आदिवासी सेवा मंडळ संचलित डी आर बी माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला.सरपंच वंदनाताई भादले यांनी एनीटाईम इंडिया न्युजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एनीटाईम इंडिया न्युजचे मुख्य संपादक आत्माराम पाटील व कार्यकारी संपादक संदिप पाटील यांनी आपल्या प्रेक्षकांना उत्तम दर्जाच्या बातम्या व दिनदर्शिका मीळावी यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहु असे सांगितले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र रायसिंग भादले, उपाध्यक्ष धनंजय रायसिंग भादले ,सचिव ज्ञानेश्वर रायसिंग भादले, सरपंच सौ वंदनाताई भादले,मुख्याध्यापक जगदीश महाजन सर व शिक्षक बांधवांनी एनीटाईम इंडियाला पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा दिल्या .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button