Paranda

अन्याय झाला असेल तर कायद्याचा वापर करा – पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद

अन्याय झाला असेल तर कायद्याचा वापर करा – पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद

सुरेश बागडे

परंडा: ( सा.वा )दि.०३

आपल्यावर अन्याय होत असेल तर कायद्याचा वापर करा असे मत परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उद्घाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केले महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युवती मंच आणि महिला लैंगिक छळ व तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय तालुकास्तरीय युवती मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक सय्यद इक्बाल उपस्थित होते त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ दीपा सावळे या उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर प्रा सज्‍जन यादव महिला लैगिक छळ व तक्रार निवारण समितीचे समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्यक्ती मंचच्या समन्वयक प्रा पायघन के आर, प्रा सय्यद एम एल आदी उपस्थित होते जयंतीनिमित्त तृप्ती करळे, औसरे स्नेहा आणि शेजाळ लक्षण या विद्यार्थानी आपली मनोगते व्यक्त केली. पोलीस निरीक्षक सय्यद इक्बाल यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी त्यांनी आपल्यावर खूप मोठे अपेक्षांचं ओझं ठेवलेल आहे त्या अपेक्षांचा भंग होऊ नये याची जबाबदारी मुलींनी घ्यावी अनेक वेळा पोलीस ठाण्यांमध्ये खोट्या तक्रारी दिल्या जातात त्यामुळे पोलिस प्रशासनाला टोकाची पावले उचलावी लागतात तेव्हा जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही कायद्याचा वापर करा कायदा स्त्रियांच्या बाजूने जास्त दिसून येतो अनेक कलमे महिलांच्या साठीच तयार झालेली आहेत याचं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते प्रा सज्जन यादव यांनी स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षेमध्ये चांगली तयारी केल्यास हमखास यश प्राप्त होते त्यासाठी केवळ इतरत्र न जाता आपल्याच महाविद्यालयांमध्ये प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास विविध पदावर ती जाता येते असे मत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ दिपा सावळे म्हणाल्या की या महाविद्यालयांमध्ये आदर्श संस्कार दिले जातात त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये निरोगी वातावरण आहे मुलींचे शिक्षण महत्त्वाचे आहे त्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी या समाजासाठी शैक्षणिक कार्य हाती घेतले त्यासाठी त्यांना अनेक त्रास सहन करायला लागले आहेत याची जाणीव मुलींनी महिलांनी ठेवली पाहिजे तरच या जयंतीचे महत्त्व प्राप्त होईल या दिवसाचे औचित्य साधून सारी डे हा विशेष उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एकशे दहा विद्यार्थी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युवा मंच आणि महिला व तक्रारी व समितीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते प्रा जगन्नाथ माळी, प्रा डॉ गजेंद्र रंदील , प्रा विद्याधर नलवडे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन या समितीचे समन्वयक डॉक्टर शहाजी चंदनशिव यांनी केले तर आभार प्रा सय्यद एम एल यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button