Chalisgaon

अखेर भोरस व करगाव गावाचा विजेचा लपंडाव संपला, आमदार मंगेश चव्हाण यांच्या निधीतून भोरस गावासाठी स्वतंत्र फिडर

अखेर भोरस व करगाव गावाचा विजेचा लपंडाव संपला,

आमदार मंगेश चव्हाण यांच्या निधीतून भोरस गावासाठी स्वतंत्र फिडर
मागणी २४ तास सिंगल फेजची मिळतोय २४ तास थ्री फेज वीजपुरवठा

मनोज भोसले
चाळीसगाव तालुक्यातील करगाव फिडर वर भोरस बु व भोरस खु तसेच करगाव गाव, चैतन्य तांडा व इच्छापूर तांडा इतक्या गावांचा ओव्हर लोड होत असल्याने या सर्व गावांना मागील 4 ते 5 वर्षांपासून अनियमित वीजपूरवठ्याला सामोरे जावे लागत होतं.
दिवसातून 20 ते 25 वेळा विजेचा लपंडाव सुरू राहत असल्याने ग्रामस्थ त्रस्त होते.
तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, गावातील छोटे मोठे व्यावसायिक व नागरिकांचे मोठे नुकसान होत होते.
याबाबत स्थानिक ग्रामस्थांची करगाव फिडरमधून भोरस फिडर वेगळे करण्यात यावे व दोन्ही गावांना २४ तास सिंगल फेज वीजपुरवठा मिळावा अशी मागील अनेक वर्षांपासून मागणी होती. सदर बाब आमदार मंगेशदादा यांच्या लक्षात आली असता त्यांनी तातडीने पत्र देऊन आपल्या जिल्हा नियोजन समितीतून ४ लाख २० हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला.
या निधीतून नवीन ११ केव्ही लाईन भोरस फाटा पासून ते भोरस गावापर्यंत टाकण्यात आली.

तसेच करगाव फिडर मधून भोरस फिडर वेगळे केल्याने दोन्ही गावांचा वीजपुरवठा नियमितपणे झाला असून आता २४ तास सिंगल भोरस व करगाव या दोन्ही गावांना २४ तास थ्री फेज वीजपुरवठा मिळत आहे.
अखेर मागील ५ वर्षांचा विजेचा लपंडाव संपल्याने भोरस व करगाव येथील ग्रामस्थांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button