Pandharpur

? महाराष्ट्र मराठी 7 च्या बातमीचा दणका पंढरपूर जिजामाता उद्यानात बसवले नवीन खेळणी झोपाळा नगरपालिकेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती विक्रम शिरसाट यांनी घेतली दखल

? महाराष्ट्र मराठी 7 च्या बातमीचा दणका पंढरपूर जिजामाता उद्यानात बसवले नवीन खेळणी झोपाळा
नगरपालिकेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती विक्रम शिरसाट यांनी घेतली दखल

प्रतिनिधी रफिक आत्तार

बातमीची दखल

पंढरपूर दि 12 फेब्रुवारीयेथील जिजामाता उद्यानाला कोणी वालीच नाही तसेच नगर परिषदेचे व नगरसेवकांचे दुर्लक्ष आणि उद्यान बनले आत्महत्या चे ठिकाण या मधल्या संदर्भात पहिली बातमी महाराष्ट्र मराठी 7 ने सडेतोड निर्भीडपणे प्रसिद्ध केली होती. पंढरपूर शहरातील नागरिकांच्या व बालकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा आम्ही परखड अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत नपा चे मुख्याधिकारी श्री अनिकेत मनोरकर व नगराध्यक्ष यांच्यासह सर्व नगरसेवकांनी जिजामाता उद्यानातील झोपाळा, खेळणी, इतर साहित्याचे नवीन बसविण्याचा ताबडतोब निर्णय घेतल्याने त्याचबरोबर उद्यानातील साचलेला पालापाचोळा कचरा काढून स्वच्छता करण्याची ताबडतोब कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याने आज उद्यान स्वच्छ करत असताना दिसून आल्याने पंढरपूर शहर वाशी यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

? महाराष्ट्र मराठी 7 च्या बातमीचा दणका पंढरपूर जिजामाता उद्यानात बसवले नवीन खेळणी झोपाळा नगरपालिकेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती विक्रम शिरसाट यांनी घेतली दखल

सुंदर पंढरी स्वच्छ पंढरी या प्रमाणेच यापुढेही उद्यान स्वच्छ बघण्यास मिळेल तसेच चिमुकल्या बालकांना खेळण्या-बागडण्याच्या साठी खेळणी झोपाळा घसरगुंडी इतर साहित्य नवीनच बसविण्यात येत असल्याने पुन्हा उद्यानाला शोभा येणार आहे .
या उद्यानाला एक रुपया प्रवेश फी आकारली जात आहे त्यामुळे जरी सध्या उद्यानावर नफा प्रशासनाने खर्च केला तरी तो पंढरपूरकर व तमाम लोकांसाठी स्वार्थ ठरणार आहे तसेच हे जिजामाता उद्यान पुन्हा सुंदर दिसणार हे मात्र नक्की आहे.
उद्यानातील चिमुकल्या बालकांची झुक झुक आगीनगाडी उदा बाबा रेल्वे गाडी सुरू करावी गाडी सुरू ठेवल्यास नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ नक्कीच होणार आहे तसेच रंगीबेरंगी पाण्याचा कारंजा होत सुरू करावा यामुळे बालकांच्या मनाला मोठा आनंद मिळणार आहे.
जिजमाता उद्यान आला सिक्युरिटी गार्डची खरी गरज आहे.काही दिवसापूर्वी या उद्यानाला असणारे दगडी कंपाउंड फोडून काही अज्ञातांनी यातील सामान गायब केल्याच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे या उद्यानाची देखभाल आणि कोणतीही याठिकाणी अडचण अथवा अनुचित प्रकार घडणार नाहीत पंढरपूर शहर ग्रामीण मधून येणाऱ्या नागरिकां बरोबरच बालकांचे ही संरक्षण करता येईल त्यासाठी जिजामाता उद्यान आला सेक्युरिटी गार्ड ची खरी गरज आहे.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत अशीही विठ्ठलाची पंढरी या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनाला बाहेरून येणाऱ्या भाविकांची दररोज मोठी गर्दी असते शहराच्या मध्यवर्ती विठ्ठल मंदिराच्या हाकेच्या अंतरावर असणारे हे उद्यान आहे हे उद्यान जर स्वच्छ सुंदर ठेवले तर बाहेरून येणाऱ्या भावी कलाही उद्यान बघून मनाला आनंद वाटला पाहिजे की खरेच स्वच्छ पंढरी सुंदर पंढरी आहे आपण ह्या ठिकाणी देवदर्शन करून थोडावेळ का होईना पण या उद्यानात जाऊन आपणही मुला बाळासोबत आनंद घ्यावा त्यासाठी नगरपरिषदेने त्याठिकाणी कायमची स्वच्छता राखण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करून स्वच्छ पंढरी सुंदर पंढरी स्वच्छ उद्यानाचा संदेश सर्व पर्यंत पोहोचेल याची दखल घ्यावी हीच आमच्या पंढरपूर शहरवासीयांची आपल्याकडून अपेक्षा राहील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button