भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक ; एकाचा जागीच मृत्यू..
रजनीकांत पाटील
जळगाव प्रतिनिधी : > जळगाव एस टी डेपोत वाहक असणारे राजेंद्र केवारे वय ४० यांचा १२ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने केवारे यांचा जागीच मृत्यू झालीची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ; राजेंद्र किसान केवारे वय ४०, रा. पिंपाळा हे कामानिमित घराबाहेर पडले होते. पाच मिनिटात येतो असे सांगून घराबाहेर पडले बांभोरीला निघाले होते. एसएसबीटी कॉलेज जवळ अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना स्थळी पाळधी पोलिसांनी धाव घेतली असून पंचनाम्याचे काम सुरु आहे. राजेंद्र केवारे यांची धुळे डेपोतून नुकतीच जळगाव डेपोला बदली झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.






