Latur

लॉक डाऊन च्या आडून दलित-आदिवासीं बौद्धांवर होत असलेल्या प्रकरणांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.

लॉक डाऊन च्या आडून दलित-आदिवासीं बौद्धांवर होत असलेल्या प्रकरणांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.

लातूर प्रतिनिधी:–लक्ष्मण कांबळे

कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे त्याच्या आडून काही गावगुंड दलित – बौद्ध – आदिवासीं वर अत्याचार करत आहेत त्यांचे हत्याकांड घडवत आहेत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. अनिल जी देशमुख यांच्या मतदार संघात नरखेड तालुक्यातील (नागपूर जिल्हा) मेंढला पंचायत समिती सदस्य(राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या) मिथिलेश उमरकर या राजकीय गावगुंडाने त्याच्या साथीदारांसोबत उच्चशिक्षित बौद्ध तरुणांचा विष देऊन दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली आहे त्यात पोलिसांनी आत्महत्येचा (306,34 अन्वे) गुन्हा नोंद करण्यात आला असुन ते चुकीचं आहे आहे आरोपीवर 302 व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.

तसेच शिर्डी येथील सागर शेजवळ या बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आली होती त्यातील मारेकऱ्यांना राज्य सरकारने पॅरोल मंजूर केलाच कसा? त्यांचा पॅरोल तात्काळ रद्द करण्यात यावा, बीड जिल्ह्यातील मांगवडगांव येथे तीन पारधी-आदिवासी मजुरांच्या केस जलदगती न्यायालयात चालवण्यात यावी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिलजी देशमुख यांचं कोरोना काळातील योगदान व पोलीस प्रशासनाचे आम्ही कौतुकच करतो पण गृहमंत्री साहेब आपल्याच राज्यात दलित-आदिवासी सुरक्षित नाहीत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्यात भरीस भर तुमच्याच मतदारसंघातील तुमच्याच विद्यमान पंचायत समिती सदस्याने एका बौद्ध तरुणाची हत्या करून तुमच्या वरील विश्वासाला तडा जात आहे तरी आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत

१) नरखेड (जिल्हा नागपूर) तालुक्यातील उच्चशिक्षित बौद्ध तरुणाची हत्या करणाऱ्या मिथिलेश उमरकर वर 302 व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व गुंह्याचा तपास SIT मार्फत करण्यात यावा.

२) शिर्डी येथील सागर शेजवळच्या मारेकऱ्यांना कोरोना महामारी च्या आडून राज्य सरकारने त्यांना जो पॅरोल मंजूर केला आहे तो तात्काळ रद्द करावा.

३) बीड जिल्ह्यातील मांगवडगांव येथील पारधी-आदिवासींची निर्घृण हत्या करण्यात आली असून ती केस जलदगती न्यायालयात चालवण्यात यावी.

असे निवेदन जिल्हा अधिकारी लातूर यांचे मार्फत मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे गृहमंत्री मा अनिलजी देशमुख याना निवेदन देण्यात आले
यावेळी भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे शहर अध्यक्ष बबलू शिंदे शहर उपाध्यक्ष बबलू गवळे प्रसाद ढगे ब्ल्यु पॅंथर चे अध्यक्ष साधूभाऊ गायकवाड शेखर कांबळे सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा सय्यद संतोष कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित ….!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button