परंडा येथिल पत्रकार सुरेश घाडगे यांच्या घरी जबरी चोरी २ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास
सुरेश बागडे परंडा
परंडा : येथील पत्रकार सुरेश घाडगे याच्या कासीमबाग येथील घरात दि. २१ फ्रेबुवारी रात्री २-३० ते ३ वाजेच्या च्या सुमारास अज्ञात चोरांनी
घरातील सदस्याना चाकू चा धाक दाखवून घरातील ७ तोळे सोने व चांदीचे दागीने रोख रक्कम ६ हजार असा एकुन २ लाख ६६ हजार ३४० रूपये कीमतीच्या मालाची जबरी चोरी केली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्याने भुम चे उप विभागीय पोलिस आधिकारी विशाल खांबे यांनी घटणा स्थळी भेट देऊन पाहणी केली या वेळी पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे, पोलिस उप निरिक्षक बनसोडे , पोलिस उप निरिक्षक मोमीन , पोलिस उप निरिक्षक ससाने , आयबाईक पथक भुम चे पोलिस नाईक शिंगरवाड पोलिस हेड कॉन्स्टेबल पवार , महिला पोलिस नाईक शाबाना मुल्ला ,पोलिस हेड कॉन्स्टेबल काझी , पोलिस नाईक सय्यद, पोलिस कॉन्स्टेबल तरंगे, चालक घुगे ,रोडे , डोके , यांच्या सह
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक माने यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली .
या वेळी उपविभागीय पोलिस आधिकारी विशाल खांबे यांनी आरोपीच्या तपास कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या .
सुरेश घाडगे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरा विरूद्ध परंडा पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .






