तपसे चिंचोली आठवडा बाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
लातुर प्रतिनिधी :-प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:- आपल्या गावातील नागरिकांना आपल्या गावातच स्वस्त भाजीपाला योग्य दरात मिळावा, शेतकर्यांनाही आपला शेतमाल स्वत: विक्री करता यावा, या उद्देशाने गावातील प्रतिष्ठित लोकांच्या सहकार्याने ऑटो पॉईंट(बसस्थानका) जवळ गुरुवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत गावात आठवडी बाजार भरवण्यात येत आहे.
या आठवडे बाजाराच्या माध्यमातून येथील स्थानिक नागरिकांना गावातच स्वस्त दरात स्वच्छ, ताजा भाजीपाला मिळू लागला आहे.. या बाजारात भाजीपाला,किराणा दुकान, मसाल्याचे पदार्थ,खाण्याचे गोड पदार्थ,उसाचा रस ,आदी
खरेदी करण्यासाठी स्थानिकांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

◆ नागरिकांकडून स्वागत
तपसे चिंचोली हे गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असून गावात हळूहळू का होईना अनेक सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. गावात हॉटेल,किराणा दुकान, आहेत.
परंतु भाजीपाला, धान्य घेण्यासाठी नागरिकांना लामजना औसा ,किल्लारी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी जावे लागते होते. गावकऱ्यांना हा त्रास होऊ नये, तसेच शेतकर्यांनाही त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गावातील लोकांच्या पुढाकाराने आठवडे बाजार भरवला जात आहे. ही संकल्पना चांगली असून तिचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. आठवडे बाजाराची संकल्पना गावकऱ्यांच्या सोयीसाठी मांडली असून, तिला चांगला प्रतिसाद दिला जात आहे. आता यापुढेही दर गुरूवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेदरम्यान हा आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे.






