आयपीएल क्रिकेटवर जळगावात सट्टा घेणाऱ्यांना एलसीबीच्या पथकाने सापळा रचून घेतले ताब्यात ; १० मोबाईल जप्त
रजनीकांत पाटील
जळगाव ::> दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेटवर जळगावात १९ सप्टेंबरपासून सट्टा घेणाऱ्या दाेन सटाेड्यांना बुधवारी रात्री ९ वाजता शिव कॉलनीतील एका अपार्टमेंटमधून एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. या दोघांकडून १० मोबाइल, टीव्ही असे साहित्य जप्त केले आहे. या सटाेड्यांना जेरबंद करण्यासाठी गेल्या ३ दिवसापासून एलसीबीच्या पथकाने एक डमी ग्राहकाला तयार करुन त्याला सट्टा खेळण्यात गुंतवून सापळा रचला हाेता. खात्री पटल्यानंतर पथकाने कारवाई केली.
योगेश प्रदीप महाजन (२६, रा. गंगासागर अपार्टमेंट, शिव कॉलनी), राजेंद्र श्रीराम पाटील (३९, रा. गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा) असे सटोड्यांची नावे आहेत. योगेश व राजेंद्र हे आयपीएलचे सत्र सुरू झाल्यापासून प्रत्येक मॅचवर सट्टा घेत होते. रोज रात्री दुबईत क्रिकेटची मॅच सुरू होताच योगेश याच्या गंगासागर अपार्टमेंटमधील घरात सट्टा घेण्याचा धंदा सुरू होता. सव्वा लाखांचा एेवज पाेलिसांनी जप्त केला अाहे.






