Amalner

?️ Big Breaking.. विजय फरसाण,कमल टी डेपो इ आहेत अमळनेर प्रशासनाचे जावई ?

?️ Big Breaking.. विजय फरसाण,कमल टी डेपो इ आहेत अमळनेर प्रशासनाचे जावई ?

अमळनेर येथे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन चा चौथा टप्पा सुरू आहे. लॉक डाऊनच्या अगदी पहिल्या टप्प्या पासून गेल्या 2 महिन्यात काही दुकानदार सातत्याने संचारबंदी आणि जमावबंदी चे लॉक डाऊन चे नियम मोडत आहेत.यात सोशल डिस्टनगसिंग नसणे,ग्राहकांच्या सोई साठी सॅनिटायझर नसणे,दिवसभर दुकान सुरू ठेवणे नियमांचे पालन न करता शासकीय आदेशांना केराची टोपली दाखवत मग्रुरी करणे इ गोष्टींचा समावेश आहे. असे वाटते की लॉक डावूनचे नियम ह्या लोकांसाठी नसून फक्त गरीब ,हात मजुरी करणारे छोटे मोठे भाजी विक्रेते किंवा फळ विक्रते यांच्या साठी च फक्त नियम आहेत.

आता पर्यंत अनेक वेळा ह्या दुकानांचे फोटो माहिती प्रशासनाला दिली आहे परन्तु हे दुकानदार बहुतेक अमळनेर प्रशासनाचे जावई आहेत त्यामुळे त्यांना सर्व काही माफ आहे इतपत शंका यायला लागली आहे.

या दुकानांमध्ये सर्वात मोठा जावई विजय फरसाण चे मालक आहेत,पाठोपाठ नं आहे कमल टी डेपो यांच्या मालकाचा,यांनतर येतात कोमल ट्रेडर्स चे मालक,कोमल स्वीटस,कैलास ट्रेडिंग कंपनी, तंबाखू विक्रेता पटेल विनेश चंद ,शंकर ट्रेडर्स, चेतन प्रॉव्हिजन,शंकर टी डेपो,सेवामल बिनिया मल किराणा इ चा समावेश आहे.तरी प्रशासनाने आपला तो बाळ्या अन दुसऱ्याच ते कार्ट असा भेदभाव न करता लॉक डावूनच्या काळात तरी भ्रष्टाचाराला आळा बसवून ठराविक लोकांची मनमानी थांबवावी अश्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button