खासदार उन्मेश दादा यांनी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची लोकसभेत केली आग्रही मागणी
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून नुकसानीची अधिकाधिक मदत मिळावी : महसूल विभागाच्या माध्यमातून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश व्हावेत
मनोज भोसले
जळगाव – जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे अनेक गावांतील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या गावांतील नुकसानग्रस्त पीकांचे पंतप्रधान पीक विमा योजनेतून भरपाईसाठी सरसकट पंचनामे करण्यात यावे यासाठी महसूल यंत्रणेला आदेश व्हावेत तसेच केंद्राकडूनही शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून नुकसानीची अधिकाधिक मदत मिळावी अशी आग्रही मागणी आज लोकसभेत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली.जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील रब्बी पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये केळी, गहू, मका,रब्बी ज्वारी (दादर )व भाजीपाला आदि पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे तब्बल २९४ गावातील ३१ हजार ११७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. एकूण ३० हजार २६० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून शेतकरी बांधव उद्धवस्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आपत्ती निवारण अंतर्गत अधिकाधिक मदत मिळावी. अशी मागणी लोकसभेत खासदार उन्मेष पाटील यांनी मांडल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे .






