पोलीस थकले मारून मुख्याध्यापकाला सांगितले मारा आता ह्यांना
प्रशांत नेटके
लातूर | लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यात चापोलीमध्ये लाठीचार्ज करुन करुन पोलिसांचे हात दुखत असल्याने पोलिसांनी एका मुख्याध्यापकांनाच लाठीचार्ज करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दत्ता कुलकर्णी असं या मुख्याध्यापकांचं नाव आहे. ते चापोली येथील स्वामी विवेकानंत विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. तर सुभाष हरणे असं संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.






