अदामा इंडिया प्रा.ली च्या वतीने सिमेंट बेंच वाटप ..
मनोज गोरे कोपरणा
कोपरणा : आज दिनांक 1 एप्रिल 2021 रोजी मु.चन्नई तालुका कोरपना जिल्हा.चंद्रपुर येथे अदामा इंडिया प्रा. ली.कंपनी च्या वतीने CSR ऍक्टिव्हिटी च्या अंतर्गत चन्नई ह्या गावामध्ये सीमेंट बेंचचे वाटप करण्यात आले .ह्या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री श्याम तुळणकर रिजनल मार्केटिंग मॅनेजर यवतमाळ हे होते . . समाजात जगत असताना प्रत्येकाने सामाजिक दायित्वाचे जबाबदारी घेणं आवश्यक आहे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले . .तसेच कार्यक्रमाला चंद्रपुर टेरीटरी मॅनेजर तन्मय बन्नोरे उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदामा प्रायव्हेट लिमिटेड कोरपणा चे तालुका प्रतिनिधी समीर मांडवकर यानि परिश्रम घेतले गावातील सरपंच अरून मडावी व पोलीस पाटील वामनभाऊ खाडे तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांनी अदामा इंडिया प्रा.ली.कंपनी बद्दल कंपनीच्या प्रॉडक्ट बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आणि येणार्या काळात शेतीविषयक आवश्यक सुधारणा आधुनिक शेतीचे तंत्र तसेच फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले






