Jalgaon

केळी पीक विमा जाचक निकष बदलावे, जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी खा.रक्षाताई खडसेंची भेट घेऊन दिले निवेदन

केळी पीक विमा जाचक निकष बदलावे, जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी
खा.रक्षाताई खडसेंची भेट घेऊन दिले निवेदन

राज्य शासनाने केळी पीक विमा संदर्भात लावलेले जाचक निकष बदलुन पूर्वी प्रमाणे करणे बाबत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी खा. रक्षाताई खडसे यांची भेट घेतली. यावेळी खा.रक्षाताई खडसे यांनी प्रयत्न चालू असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन दिले.

खा.रक्षाताई खडसेंनी केली केंद्रीय सचिव, विरोधी पक्षनेते व उपमुख्यमंत्री यांच्याशी दूरध्वनी द्वारे चर्चा राज्य शासनाने केळी पीक विमा संदर्भात लावलेले जाचक निकष बदलून पूर्वीप्रमाणे करणे बाबत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तत्काळ केंद्रीय सचिव, कृषी व शेतकरी कल्याण विभाग डॉ.आशिष कुमार भुतानी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरध्वनी द्वारे चर्चा कळून तत्काळ योग्य निर्णय घेण्यास सांगितले.

राज्य सरकारने सन २०२१ ते २०२३ साठी लावलेल्या प्रधानमंत्री केळी पीक विम्याच्या जाचक निकष बदलविनेसाठी खासदार राक्षताई खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा.शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांना चार महिन्यापासून वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे. तरी केंद्र सरकार व राज्य सरकार हा निर्णय एकमेकांवर लोटत असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाअभावी केळी उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून खासदार रक्षाताई खडसेंनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केंद्र व राज्य सरकार मध्ये समन्वयाची भूमिका पार पाडावी असे निवेदन दिले होते.

यावेळी जिल्ह्यातील समस्त केळी उत्पादकांच्या वतीने रामभाऊ पाटील (भाजपा तालुकाध्यक्ष), विनोद रामभाऊ तराळ (अंतुर्ली), ईश्वर रहाणे (हरताळा), यु. डी. पाटील (कुऱ्हा), किरण बाबुराव महाजन (चांगदेव), डॉ.अनिल भागवत चौधरी (चिंचोल), विशाल किशोर महाजन (नायगाव), पंकज सुभाष पाटील (बेलसवाडी), सागर राजेंद्र महाजन (हिंगोणा), राहुल पाटील (बलवाडी), शशांक पाटील (तांदलवाडी), नारायण शशिकांत पाटील (भालोद), राजाराम कडू पाटील (चिंचोल) तसेच मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, यावल, भुसावळ व चोपडा येथील केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button