Maharashtra

” गरजू वंचितांची दिवाळी आनंदी करुया ” पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेमार्फत आवाहन

” गरजू वंचितांची दिवाळी आनंदी करुया ” पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेमार्फत आवाहन

महाराष्ट्र : ‘तुम्हाला नको असेल ते आम्हाला द्या,आम्ही ते गरजूंपर्यंत पोहोचवू’ असे ब्रीद घेऊन सुरुवात झालेल्या पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेच्या ‘माणुसकी’ उपक्रम अंतर्गत ‘मदतीचा हात’ ही समाज उपयोगी मोहीम संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे सर व राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भांडारकर यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्र राज्य सोबतच संपूर्ण भारतात सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमे अंतर्गत संपूर्ण देशांत या वर्षी गरजू , गोर गरीबांची दिवाळी आनंदी साजरी व्हावी यांसाठी भारतातील आर्थिक परिस्थिती श्रीमंत,मध्यमवर्गीय असलेल्या प्रत्येक कुटुंबाने आपल्या कडील दिवाळीचे फराळ तसेच इच्छुक असल्यास, साबण , टूथपेस्ट , टूथब्रश , तेल , कपडे इत्यादी शक्य होईल त्या दैनंदिन वापरातील वस्तू संस्थेकडे जमा कराव्यात. आम्ही त्या संस्थेच्या तालुका , जिल्हा पदाधिकारी मार्फत गरीब, वंचित गरजूंपर्यंत पोहोचवू , इच्छुकांनी मदत करावयाची असल्यास व अधिक माहितीसाठी ७०५७०५०६४२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक देवा तांबे यांनी केले आहे.

तसेच या संस्थेच्या दातृत्वाची ओळख देशभरात पोहाचविणारा हा उपक्रम नंतरही आपण पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेच्या ‘माणुसकी – मदतीचा हात’ या अभियाना अंतर्गत गरीब,गरजूंना दैनंदिन वापरातील वस्तू महाराष्ट्र राज्यसोबतच इतर राज्यातही संस्थेच्या पदाधिकारी मार्फत वाटप करणार असल्याची माहिती संस्थापक यांनी दिली.
यांसाठी दानशूर व इच्छुकांनी घरगुती वापरातील वस्तू सोबतच वापरण्यायोग्य नवे-जुने कपडे संस्थेच्या पदाधिकारी कडे दान करावेत. कपडे देताना ते स्वच्छ धुवून, इस्त्री करुन आणि पुरूष, मुले आणि महिला अशी वर्गवारी करुन दिल्यास ते गरीब गरजूंना अधिक चांगल्या पद्धतीने देता येतील.
या समाजउपयोगी उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक श्री.तांबे सर यांनी केले आहे.

या उपक्रमाच्या संयोजनासाठी संस्थेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी,दिल्ली शहर पदाधिकारी तसेच कर्नाटक,छत्तीसगढ़,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातील पदाधिकारी प्रामाणिक परिश्रम घेत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button