गेवराईत ‘प्रेस क्लब’ कडून संसारपयोगी साहीत्याचे वाटप
सुभाष मुळे लातूर
गेवराई : वृत्तपत्र क्षेत्रातील महत्वकांक्षी गरजूंना संसारपयोगी साहीत्याचे वाटप करुन एक अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. गेवराईतील ‘प्रेस क्लब’ कडून पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या गेवराई येथील कार्यालयात ‘प्रेस क्लब’ चे अध्यक्ष पत्रकार सुभाष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ‘दर्पन दिन’ कार्यक्रमास महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा ‘प्रेस क्लब’ चे सचिव बापुसाहेब हुंबरे, ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा ‘प्रेस क्लब’ चे उपाध्यक्ष चंद्रकांत हक्कदार, कोषाध्यक्ष चंद्रकांत नवपुते, संघटक शिवनाथ काळे आदींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ‘प्रेस क्लब’ चे अध्यक्ष पत्रकार सुभाष मुळे म्हणाले की, ६ जानेवारी हा दिवस राज्यात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. इंग्रज राजवटीत मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी आपल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्राचा शुभारंभ केला. याबद्दल पत्रकारांतर्फे मी वंदनीय बाळशास्त्रींना विनम्र अभिवादन करतो. मराठी पत्रकारितेचे निर्माते वंदनीय बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘या’ क्षेत्राला जे भरीव योगदान दिलं आहे, दर्पणकार यांचा जन्म कोकणातील पोंभूर्ले येथे १८१२ साली झाला, अन् जणू मराठी पत्रकारितेच्या क्षितिजावर तेजस्वी तारा उदयास आला. वंदनीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने ओळखले जाणारे क्षेत्र म्हणजे पत्रकारिता होय. पारतंत्र्याच्या कालखंडात लोकशिक्षण, समाजप्रबोधन करून रयतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्यासाठी खासकरून दर्पणकारांनी पत्रकारिता केली असे सांगून आजच्या पत्रकार बांधवांनी विश्वासार्हतेने काम करुन क्षेत्र जोपासले पाहीजे असेही ते म्हणाले. यावेळी चंद्रकांत हक्कदार, चंद्रकांत नवपुते, शिवनाथ काळे आदिंनी आपले विचार मांडून या दिनाचे महत्व विषद केले.
या कार्यक्रमास कुमारराव देशपांडे, अनिल बेदरे, सुभाष परदेशी, विलास आबूज, सखाराम पोहीकर, विश्वनाथ शरणांगत, शेख अतिख, गहिनीनाथ काशीद, विलास शिंदे, अशोक सुरासे, विनोद दुरांडे, युवराज धुरंधरे आदींसह वृत्तपत्र क्षेत्रातील बांधवांची मोठी उपस्थिती होती.






