Mollywood

दे धक्कातील शुक्राची चांदणी आता झाली आहे मोठी..लवकरच पुन्हा झळकेल पडद्यावर..

दे धक्कातील शुक्राची चांदणी आता झाली आहे मोठी..लवकरच पुन्हा झळकेल पडद्यावर..

मुंबई दे धक्का हा चित्रपट आजही सर्वांनाच आवडतो..यातील कलाकार आणि त्यांचा अभिनय देखील प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला आहे. हा चित्रपट २००८ साली रिलीज झालेला चित्रपट प्रचंड गाजला होता.
या चित्रपटामध्ये सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम आणि मेधा मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.पण चित्रपटातील दोन बालकलाकार सर्वांच्याच लक्षात राहीले. हे दोन बालकलाकार म्हणजे सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य हे होय.या चित्रपटातील शुक्राची चांदणी ह्या गाण्यावर गौरीने उत्तम नृत्य सादर केले होते. आता मात्र हे बालकलाकार खूप मोठे झाले आहेत.

या चित्रपटातील बालकलाकार गौरी वैद्य हिच्या बद्दल जाणून घेणार आहोत. गौरी वैद्य हिने ‘दे धक्का’ चित्रपटात मकरंद अनासपुरेंची मुलगी म्हणजेच सायली हिची भूमिका साकारली होती. गौरीच्या ‘उगवली शुक्राची चांदणी’ या गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.

दे धक्का मधील तिच्या या गाण्याने तिला एक नवीन ओळख करून दिली. हा चित्रपट १६ मे २००८ ला रिलीज झाला होता. या चित्रपटानंतर गौरी ‘शिक्षणाच्या आईचो घो’ या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. यामध्ये तिने सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली. तसेच तिने २०११ मध्ये देखील ‘एका पेक्षा एक जोडीचा मामला’ या रियालिटी शोमध्ये तिने सक्षम सोबत काम केले. याशिवाय गौरीने २०१५ साली ‘आवाहन’ या चित्रपटात काम केले होते.

‘आवाहन’ चित्रपटानंतर गौरी मनोरंजनसृष्टी पासून खूपच दुरावली आहे. ‘दे धक्का’ या चित्रपटानंतर गौरी खूपच मोठी झाली आहे आणि तिचा लुक ही खूपच बदलला आहे. गौरी खूप सुंदर व आकर्षक दिसते आहे. आपण तीला ओळखू ही शकणार नाही इतकी सुंदर दिसत आहे.

गौरीने आता आपल्या आपल्या शिक्षणावरती जास्त लक्ष केंद्रित केले आहे. गौरी आता मोठी म्हणजे साधारणतः पंचवीस वर्षाची झाली आहे. तिने मुंबईमध्ये ‘डि. जी. रुपारेल महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर तिने इंजीनियरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नोलॉजी मधून पदवी शिक्षण पूर्ण केले. गौरीला पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करताना पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. त्याचप्रमाणे पुढे गौरी कोणत्या चित्रपटात पाहायला मिळेल याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे.लवकरच गौरी पडद्यावर दिसणार आहे.

Leave a Reply

Back to top button