हरी भाऊ जावळे यांची भालोद मध्ये भव्य प्रचार रैली जणू विजयी जल्लोष चे प्रतीकच …
विलास ताठे
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ना.हरीभाऊ जावळे यांची आज त्यांच्या राहात्या गावातुन उस्फूर्त भव्य प्रचार रैलीचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते.
१९९९ च्या पहिल्या आमदारकीला ज्या प्रमाणे सर्व भालोद वासियानी स्वयस्फुर्तीने प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती त्याच प्रमाणे ह्याही वेळेस सर्व भालोद वासियानी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे .
प्रचाराच्या वेळेस सर्व गावकऱ्यांनी पुष्प वर्षाव करुन हरीभाऊचे स्वागत केले.गावात औक्षण करुन आणि दारोदारी रांगोळ्या काढुन हरी भाउंच उस्फुर्त स्वागत सर्व भालोद वासियानी केल आणि या वेळी हरीभाऊना मोठ्या मताधिक्याने विजयी करायच असा दृढ संकल्प सर्व भालोद वासियानी एकमुखाने केला.
या वेळेस मसका चेअरमन शरद महाजन,नरेंद्र नारखेडे,हर्षल पाटील,राकेश फेगडे, उमेश पाटील,योगराज बऱ्हाटे,नारायण चौधरी,गणेश नेहते,लक्षमण चौधरी,नितिन चौधरी, मोहन जावळे, मिनल जावळे,भारती चौधरी, सरपंच मिना भालेराव ,मनोज जावळे, दिलिप चौधरी,अशोक महाजन, उप सरपंच जाबिर खान,नीळकंठ चौधरी, रमेश झांबरे, रेहाना तडवी आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






