44 वर्षीय पोलीस विनोद अहिरे, 63 व्या पोलीस स्थापना दिनाला 63 किलोमीटर स्केटिंग करून करणार विक्रम
2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाल्याची अधिकृत घोषणा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली, त्यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान करण्यात आला. त्या दिवसापासून दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात येतो. 2 जानेवारीपासून पूर्ण आठवडा महाराष्ट्र पोलीस आपापल्या घटकात विविध उपक्रम राबवून साजरा करीत असते. त्यात जळगाव जिल्हा पोलीस दलाने पोलीस बँड चे विविध धून वाजवून, शस्त्र प्रदर्शन, रॅली काढून साजरा करीत आहेत.
दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू विनोद अहिरे हे पोलीस वसहतीतील एक किलोमीटरच्या रोड ट्रॅकवरून सलग 63 किलोमीटर स्केटिंग करून महाराष्ट्र पोलीस सप्ताह साजरा करणार आहेत. अशा पद्धतीने पोलीस खात्यात वीस वर्ष सेवा झालेले, 44 वर्ष वर असलेले पोलीस, 63 किलोमीटर स्केटिंग करून पोलीस स्थापना दिन साजरा करणारही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिलीच घटना असेल. दिनांक ०८/०१/२०२३ रविवार रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली / उपस्थितीत पोलीस मुख्यालयातील 252(नवीन इमारत) बिल्डिंग नंबर पाच समोरून सकाळी आठ वाजता अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे विनोद अहिरे यांना हिरवी झेंडी दाखवतील.
या अगोदरही विनोद अहिरे यांनी त्यांचा चाळीसावा वाढदिवस सलग 40 किलोमीटर स्केटिंग करून साजरा केलेला आहे.
त्याचबरोबर ते कराटे,आईस हॉकी, जलतरणाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत.
सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त शहरवासीयांनी आणि खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.






