Jalgaon

गुलाबराव पाटील निवडून आले तर जळगांव जिल्ह्यात सेना संपेल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट.

गुलाबराव पाटील निवडून आले तर जळगांव जिल्ह्यात सेना संपेल
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट.

गुलाबराव पाटील निवडून आले तर जळगांव जिल्ह्यात सेना संपेल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट.

 प्रतिनिधि अनिल पाटील
जळगाव – शिवसेनेचे आहोत शिवसेनेचे राहू मात्र गुलाबराव पाटील यांचा प्रचार करणार नाही, कारण ते निवडून आल्यावर पूर्ण पक्ष संपवतील, वरिष्ठांची ही त्यांच्या बद्दल नाराजी आहे,अपक्ष उमेदवाराच्या व्यासपीठावर भगवा टाकून त्यांना पाठिंबा देणार सरपंच व शिवसैनिक नाईलाजाने मेळाव्याला येतं आहेत. असा जानकिराम पाटील यांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक गौप्यस्फोट.
पत्रकार परिषदेत त्यांनी संतप्त भावना मांडल्या मंत्रिपद मिळाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी गटातटाचे राजकारण करून  जिल्ह्यात शिवसेना संपविली आता त्यांना कसलंही सहकार्य राहणार नाही, त्यांच्या विरोधात काम करेल अस ते म्हणाले
पक्षातील वरिष्ठांची ही त्यांच्या बद्दल नाराजी असून यांनी केवळ गुलाबराव एक गुलाबराव असाच पक्ष ठेवला असून दुसऱ्याला कुणालाही संधी दिली नाही. 
गुलाबराव पाटील यांनी जळगावात इच्छुकांच्या मुलाखती ठेवल्या असत्या तर बुटांचे हार पडले यास्तव, याची कल्पना असल्यानेच कुठल्याही इच्छुक सच्या शिवसैनिकला संधी मिळाली नाही, आताही या मतदार संघात त्यांच्या विरोधात सेनेकडून 25 इच्छुक उमेदवार आहेत. असेही पाटील म्हणाले, कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात घेतले जात नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत शेतकरी मरतो तरी त्याचे कर्ज माफ होत नहो, आधी स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्यांची मंत्री पदा नंतरची भाषणे एका. 
गुलाबराव पाटील यांच्याशी आता कसलाही संबंध नाही, संपर्क प्रमुखांनी त्यांच्या पक्षप्रमुखांपर्यंत तक्रारी केलेल्या आहेत, त्यामुळे आता त्यांना सहकार्य नाही, अशी स्पष्ट भूमिका पाटील यांनी मांडली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button