Baramati

जागतिक आदिवासी दिन बारामतीत उत्सवात साजरा

जागतिक आदिवासी दिन बारामतीत उत्सवात साजरा

प्रतिनिधी- आनंद काळे

बारामती- बारामती तालुक्यातील मौजे मेखळी ह्याठिकाणी जागतिक आदिवासी दिन उस्तवात साजरा करण्यात आला. आदिवासी शूरवीरांचे प्रतिमेचे पूजन व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय सम्राट सेना(पारधी आघाडी)चे प्रदेशाध्यक्ष श्री बापूराव काळे यांच्या हस्ते पार पडले.

बारामती शहर काही कालांतराने स्मार्ट सिटी म्हणून गणले जाणार आहे,त्याचप्रमाणे पारधी समाज्यातील सुशिक्षित तरुणांना प्रशासनाने स्मार्ट बनवण्यासाठी प्रयत्न करावा व पारधी समाज्यातील लोकांना पुनवर्सनासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दयावा असे आवाहन महाराष्ट्र पारधी विकास संस्थेचे उपाध्यक्ष श्री आनंद काळे(सर) यांनी केले.

पारधी समाज्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.पारधी समाज्यातील लोकांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन स्पर्धात्मक परीक्षेत यश संपादन करून समाज्याचा नावलौकिक करावा असे मनोगत महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेचे सहसचिव श्री उपदेश भोसले यांनी केले. कार्यकर्मातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 10 वी व 12 वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अभिजित काळे यांनी केले तर आभार व्यक्त श्री अक्षय भोसले यांनी केले.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पारधी विकास संस्था, महाराष्ट्र पारधी समाज संघर्षं समिती,अखिल भारतीय सम्राट सेना व महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमासाठी सागर काळे,निलेश काळे,सूरज काळे,नियोजन भोसले,नितीन शिंदे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button