रावेरात अनिल चौधरी अपक्ष उमेदवारी अर्ज छाननी वरूनच एकवटले भाजप, काँग्रेस सह एमआयएम…
रावेर प्रतिनिधी विलास ताठे
आज रावेर येथील तहसिलदार कार्यालयात सर्व उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली यावेळी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या उमेदवारी अर्जावर कॉग्रेस उमेदवार शिरीष चौधरी, एमआयएम उमेदवार विवेक ठाकरे यांनी आक्षेप घेत लेखी हरकत घेतली.
यावेळी दोन्ही उमेदवारांकडून सुमारे पाच तास युक्तीवाद झाला या आक्षेपामध्ये अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पडताळणी करून विरोधकांनी केलेला आक्षेप निकाली काढला.व विरोधकांच्या घेतलेल्या हरकती फेटाळून लावत अनिल चौधरी यांचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आला.
यावेळी अनिल चौधरी महणाले कि माझ्या उमेदवारीची धास्ती विरोधकांनी आताच पासून च घेतली आहे हेच चित्र स्पष्ट झाले कारण
रावेर विधान सभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यांच्याकडून मला भर-भरून प्रतिसाद मिळत असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पाया खालून वाळू सरकत आहे म्हणून माझ्या उमेदवारी बद्दल असे बिनबुळाचे हरकती त्यांनी घेतल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पडताळणी करून त्यांच्या हरकती निकाली काढल्या असल्याने अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना मोठा दिलासा मिळाला व त्यांच्या कार्यकर्ते यांच्या मध्ये ही मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.






