Faijpur

खान्देश नारीशक्ती तर्फे फैजपूरात सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी

खान्देश नारीशक्ती तर्फे फैजपूरात सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपूर प्रतिनिधी: रक्षाबंधनाचा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. बहीण भावाच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक म्हणून या सणाकडे बघितले जाते. बहिण आपल्या भावाला ओवाळून राखी बांधते व आपल्या बहिणीच्या रुपात समस्त नारीशक्ती चे रक्षण करण्यासाठी भावाकडून वचन घेत असते. अशाचप्रकारे फैजपूर येथील भाजपा कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा करुन एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काही दिवसांपूर्वी सफाई कामगारांचे पाय धुऊन व नमस्कार करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त फैजपूर येथील भाजपा कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ दिपाली चौधरी झोपे यांनी सकाळी ७ वाजताच फैजपूर नगरपरिषदेच्या सर्व सफाई कामगारांना राखी बांधून त्यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा केला.या अचानक घडलेल्या घटनेने सर्व सफाई कर्मचाऱ्यांना जणू एक आनंदाचा धक्काच बसला होता. आनंदाने भारावून गेलेल्या सर्व कामगारांनी त्यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा केल्याबद्दल सौ.दिपाली चौधरी यांचे मनापासून आभार मानले तसेच यावेळी फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी देखील सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्यासह मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगरसेवक संजय रल, सामाजिक कार्यकर्ते अजय मेढे, गोविंदा बिऱ्हाडे, अशोक बिऱ्हाडे, अजय घावरे, प्रल्हाद बिऱ्हाडे, हेमंत फेगडे, नटवर घावरे, आकाश घावरे, पवन गोयर, जयकिसन घावरे, विलास गोयर, देवेंद्र झोपे इ.उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button