जळगांव: कापूस व्यापारी हत्याकांड… आरोपींची ओळख परेड..! मास्टरमाइंड आरोपी अमळनेरतील..! पोलीस दलात कार्यरत..!
जळगाव एरंडोल येथील कापूस व्यापारी स्वप्निल शिंपी वय 30 यांचा खून करणाऱ्या अटकेतील सहा आरोपींची सोमवारी जिल्हा कारागृहात तालुका दंडाधिकाऱ्यांसमोर ओळख परेड घेण्यात आली.
पोलीस कर्मचारी नटवर जाधव (वय ३९, रा.अमळनेर), कुणाल ऊर्फ बंटी वाणी (वय ४०, रा. चौघुले प्लॉट, जळगाव), विक्रम सारवान (वय ३२, रा. गुरुनानक नगर, जळगाव), अंकुश गवळी (वय ३६, रा. गवळीवाडा, जळगाव), सनी पवार (वय २३, रा. शनिपेठ, जळगाव) व अशोक प्रजापत (वय २९, रा. प्रजापत नगर) अशी या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की कापूस व्यापारी स्वप्नील हा हवाल्याचे पैसे घेऊन जात असताना त्याला अडवून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात कापूस व्यापारी स्वप्निल शिंपींच्या खून प्रकरणात पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शिंपी यांना लुटण्याचा नियोजनाचा मास्टरमाइंड संशयित पोलिस कर्मचारी असल्याची बाब समोर आली. तर इतर चौघेही सराईत गुन्हेगार आहेत. शिंपी यांच्या गाडीत पाच कोटी रुपये असल्याची माहिती संशयितांना होती. त्यासाठी त्यांनी लुटीचा कट रचल्याचे समाेर आले आहे. एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे राहणारे कापूस व्यापारी शिंपी व त्यांचा मित्र दिलीप चौधरी दोघेजण २६ नोव्हेंबर रोजी जळगावातून हवाल्याचे १५ लाख ७८ हजार रुपये घेऊन फरकांडेकडे निघाले होते. या वेळी पाळधी गावाजवळ महामार्गावर चार जणांनी त्यांना अडवून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. झटापटीत एकाने शिंपी यांच्या पाेटात चाकू खुपसून खून केला. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदारांकडून माहिती घेत ७२ तासात गुन्ह्याचा छडा लावला. सोमवारी पहाटे पोलिसांच्या पाच पथकांनी एकाचवेळी पाच संशयितांच्या मुसक्या आवळल्या. गुन्ह्यात वापरलेला चाकू व दुचाकी पोलिसांनी जप्त करण्यात आले आहे.
पोलिस कर्मचारी वादग्रस्त, इतर गुन्हेगार सराईत..
१. गुन्ह्यात अटक केलेला पोलिस कर्मचारी हा सुरुवातीपासून वादग्रस्त आहे. चाळीसगाव येथे नियुक्तीस असताना त्याच्यावर एकदा लाच घेतल्याचा गुन्हाही दाखल झालेला आहे.
२. अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यांना मदत केल्याचाही ठपका त्याच्यावर आहे. या दोन्ही प्रकरणांत तो निलंबित होता. सध्या तो पोलिस मुख्यालयात नियुक्तीस होता.
३. अटकेतील इतर चारही संशयित शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुरूनानकनगर, चौगुले प्लॉट व गवळीवाडा परिसरात राहणारे आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.






