फैजपूर

प्रा.डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान.

प्रा.डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे  राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित….

प्रा.डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान.

 

फैजपूर- प्रतिनिधी सलीम पिंजारी
धनाजी नाना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी महाविद्यालयाचा विद्यार्थी हा उत्कृष्ठ खेळाडू कसा निर्माण होईल यासाठी  मोलाचे मार्गदर्शन करत असतात. विद्यार्थ्यांला शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी आणि खेळातील कार्यमान उंचमान उंचविण्यासाठी ते नेहमी विद्यार्थ्यांना आर्थिक तसेच शैक्षणिक मदत करत असतात. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती दैदीप्यमान कामगीरी केलेली आहे. या सर्वांचा विचार करुन नाशिक येथील दुधारे स्पोर्टस फाऊंडेशन तर्फे नाशिक येथे आयोजीत  राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार – 2019 ने नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी संपुर्ण भारतातुन  शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या  38  शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले. या पुरस्कार वितरण प्रसंगी  मविप्रचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक, श्री. राजेंद्र निकम, प्रसिद्ध अभिनेते श्री. नीलेश शेवडे, डॉ.बलवंत सिंह (अध्यक्ष, ग्लोबल आणि ह्युमन रिसर्च वेलफेअर सोसायटी), शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. आनंद खरे, श्री. सुनील वरकड व अशोक दुधारे आदी मान्यवर उपस्थित होते.स्वरुप सन्मान पत्र, सन्मान चिन्हे आणि ब्लेजर देऊन सन्मानीत केले. प्रा.डॉ.गोविंद सदाशिवराव मारतळे यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.माजी आमदार श्री. शिरीषदादा मधुकरराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी व सर्व उपप्राचार्य सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व मित्रपरिवार आणि खेळाडू सर्वांनी अभिनंदन केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याबद्दल प्रा.डॉ.गोविंद मारतळे यांनी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शिरीषदादा चौधरी, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व मित्र परिवार, खेळाडू आणि विषेश करुण दुधारे फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री. अशोक दुधारे यां सर्वांचे आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button