Amalner

? आधी स्वतः नियम पाळा.. मग जनतेवर बंधन घाला… अमळनेर येथील शासकीय अधिकाऱ्यांचे नियम उल्लंघन… शासकीय धनादेश शासकीय कार्यालयात घेणे बंधनकारक..

? आधी स्वतः नियम पाळा.. मग जनतेवर बंधन घाला… अमळनेर येथील शासकीय अधिकाऱ्यांचे नियम उल्लंघन…मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश शासकीय कार्यालयात घेणे बंधनकारक…

अमळनेर

येथे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू आहे. यासंदर्भात रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनेक नियम,अटी,संचारबंदी महाराष्ट्र शासनाने लागू केल्या आहेत. मा जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनांप्रमाणे वागणे प्रत्येक तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, जनता हे नियमांचे पालन करताना दिसून येत आहे. पण याला मात्र अमळनेर चे उपविभागीय अधिकारी,अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी, कर्मचारी अपवाद आहेत.ठीक ठिकाणी हे अधिकारी नियम उल्लंघन करतांना दिसून येत आहेत. यापूर्वी ही ठोस प्रहारने नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियम उल्लंघन करण्याची बातमी लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण ह्या शिर्षकासह प्रसिद्ध केली आहे.

आता अमळनेर च्या उपविभागीय अधिकारी यांचाही यात समावेश आहे. मा जिल्हाधिकारी, मा मुख्यमंत्री यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवत अधिकारी मनमानी कारभार करत आहेत. संत सखाराम महाराज संस्थान तर्फे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये 31,000/- रु चा धनादेश देण्यात आला.यावेळी उपस्थित असलेल्या एकाही शासकीय अधिकाऱ्याने चेहऱ्यावर मास्क लावलेला नाही,हातात ग्लोव्ज नाहीत,(सामाजिक अंतर) सोशल डिस्टन्स नाही इ बाबींचे उल्लंघन तर केलेच पण विशेष म्हणजे सदर धनादेश हा उपविभागीय अधिकारी कार्यालायत घेतला जाणे आवश्यक होते. परंतु संस्थानात जाऊन अधिकाऱ्यांनी हा चेक का घेतला?असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे ह्याच उपविभागीय अधिकारी सर्व सामान्य जनतेच्या कोणत्याही कागदाला, निवेदनाला,अर्जाला मी 48 तास हात लावत नाही असे म्हणतात.

दिव्यांग बांधव त्यांना आरोग्य किट आणि जीवनावश्यक वस्तू दि 26 मार्च च्या आदेशानुसार लवकर मिळाव्यात असा अर्ज करण्यासाठी गेले असता मी कागद हातात घेत नाही.. नियमांचे उल्लंघन होते असे उत्तर दिव्यांग बांधवाना दिले होते.या पार्श्वभूमीवर हा धनादेश घेत असताना चा फोटो अत्यन्त बोलका आहे.

यातील एक विशेष बाब म्हणजे हा फोटो ही बातमी प्रसिद्ध होणार..सामान्य जनता वाचणार ,पाहणार आणि अधिकारी च नियम पाळत नसतील तर आम्ही का पाळू असा विचार करून मा. मुख्यमंत्री आणि मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला जुमानणार नाहीत.स्वतः नियम पाळतील तरच जनता अधिकऱ्यांचं ऐकेल…

अधिकाऱ्यांच्या अश्या पद्धतीने नियम उल्लंघन करणे यामुळेच अमळनेर शहर 70% सुरू असून लॉक डाऊन खऱ्या अर्थाने यशस्वी झालेलाच नाही. यात बिचाऱ्या पोलीस प्रशासनाची मात्र दमछाक होते आहे.पोलीस प्रशासन सातत्याने कार्यरत असून नियम उल्लंघन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करायचे जनतेने ते पाहायचे ..राजकीय पुढाऱ्यांना सोबत यांनी फोटो सेशन करायचे…सोशल डिस्टन्स,सुरक्षितता वै खड्ड्यात घालून…चमकोगिरी करायची..आणि पोलीस प्रशासनाने 24 तास कार्यतत्पर राहायचे असे चित्र शहरात दिसून येत आहे.यावर आता काय कार्यवाही होते ते पाहणे ही महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button