Bhandra

? Big Breaking..आदिवासींनी ‘ यासाठी ‘ जाळला आमदार परिणय फुकेंचा पुतळा !

? Big Breaking..आदिवासींनी ‘ यासाठी ‘ जाळला आमदार परिणय फुकेंचा पुतळा !

भंडारा : धनगर समाजाच्या आरक्षणाला समर्थन दिल्याबद्दल संतापलेल्या आदिवासी बांधवांनी आज विधानपरिषद सदस्य आमदार परिणय फुके यांचा पुतळा जाळला. धनगर समाजाला आदिवासी समाजात गनण्यास त्यांनी विरोध केला आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाची अमंलबजावणी व्हावी, यासाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळ परिसरात अनोखे आंदोलन केले होते. यावेळी आमदार परिणय फुके यांनी स्वतः उपस्थित राहून या आंदोलनाला समर्थन दिले आहे. मूळ आदिवासी यांची संस्कृती व चालीरीती वेगळ्या असून त्यांच्या आरक्षणाला धक्का लावत आमदार परिणय फुके धनगर समाजाला आदिवासी समाजात स्थान देत असल्याचा आरोप अखिल आदिवासी विकास युवा परिषद संघटनेने केला.
फुकेंच्या या कृत्याच्या निषेध करण्यासाठी भंडारा विश्राम गृहासमोर परिणय फुके यांच्या पुतळ्याला लाथा, बुक्या मारत तो जाळण्यात आला.

अखिल आदिवासी विकास युवा परिषद संघटनेचे अध्यक्ष विनोद वटी बाईत म्हणाले, खऱ्या आदिवासींच्या विरोधात काम करणाऱ्या प्रत्येकाचा अशाच पद्धतीने निषेध करण्यात येईल. परिणय फुके आमच्या जिल्ह्याचे आमदार असून येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या आरक्षणात बोगस आदिवासींना स्थान देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. हे करण्याअगोदर त्यांनी येथील आदिवासींच्या समस्या तरी जाणून घेतल्या का? आमच्या गरजा, मागण्या काय आहेत, हे जाणून घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नसल्याचा आमचा आरोप आहे.

आदिवासींना मिळालेले आरक्षण संस्कृतीच्या बळावर मिळालेले आहे, वेगळ्या बोलीभाषेच्या आधारावर मिळालेले आहे. आमच्या विरोधात ते बोगस आदिवासींना आमच्या कोट्यात आणू पाहात आहेत. हे करुन त्यांना केवळ आपले राजकारण करून पोट भरायचे आहे. सोशल मिडीयावरदेखील त्यांना धनगरांच्या आरक्षणाला समर्थन दिले आहे. त्यामुळे आम्ही सर्व मुळ आदिवासी आमदार फुकेंसारख्या स्वार्थी नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Back to top button