Latur

लक्षवेधी ग्रामपंचायत तपसे चिंचोली ग्रामपंचायती वर दुरंगी झेंडा सरपंच पदाचा दावेदार कोण ठरणार या कडे सर्वांचे लक्ष

लक्षवेधी ग्रामपंचायत तपसे चिंचोली ग्रामपंचायती वर दुरंगी झेंडा सरपंच पदाचा दावेदार कोण ठरणार या कडे सर्वांचे लक्ष

लक्ष्मण कांबळे लातूर

औसा : तालुक्यातील तपसे चिंचोली ग्रामपंचायत निवडणुकीत आपला गाव आपला विकास पॅनलला सहा तर नरसिंह ग्राम विकास पॅनलला पाच जागा मिळाल्या

औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील ग्रामपंचायतची निवडणूक शुक्रवारी दि.१५ पार पडली. ११ सदस्य असलेल्या या ग्रापंसाठी एकूण २ पॅनलमध्ये वर्चस्वासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. त्यात एक अपक्षांनीही रंग भरला होता. सोमवारी दि.१८ निवडणुकीचा निकाल जाहीर होवून यामध्ये आपला गाव आपला विकास पॅनलचे सहा उमेदवार प्रवीण महादू कांबळे वार्ड क्रमांक एक मधून तर,वार्ड क्रमांक दोन मधून यादव युवराज दिगंबर तौर सखुबाई पद्माकर राठोड राजश्री हिराजी व वार्ड क्रमांक तीन मधून एकही जागेवर विजय मिळवता आला नसून वार्ड क्रमांक चार मधून सुरवसे विशंभर बाबू व पठाण रिजवांना मैनुदिन या उमेदवारांनी विजय मिळवला आहे तर नरसिंह ग्रामविकास पॅनलचे पाच उमेदवार वार्ड क्रमांक एक मधून काळे सुमन जैनू व स्वामी संगीता संजय तर वार्ड क्रमांक दोन मधून एकही जागेवर विजय मिळवता आला नाही तर वार्ड क्रमांक तीन मधून गाढवे शिवशंकर बालाजी व गाढवे अलका नागनाथ तर वार्ड क्रमांक चार मधून कवठाळे नितीन बब्रुवान विजय झाले असून सर्वात जास्त ६८ मताधिक्याने काळे सुमन जैनू ह्या विजयी झाले. तालुक्यातील तपसे चिंचोली या गावात ग्रामपंचायत ची स्थापना झाले पासूनआजपर्यंत बिनविरोध निवडून येणाऱ्या ग्रामपंचायत साठी यंदा दुरंगी लढत लागली होती यामुळे जिल्हयात ही लक्षवेधी ग्रामपंचयत निवडूनक होऊन यात जनतेचा कौल बदलाच्या दिशेने असल्या मुळे जनतेचा कौल मान्य करत निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य हे गावचा खरच विकास करतील का या नव निर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांकडून जनता अपेक्षा करत आहे
दोन्ही पॅनलचे निवडून आलेल्या सदस्याचे गावकऱ्यांनी स्वागत करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या खरे पण सरपंच पदाचे आरक्षण हे २२जानेवारीला सुटणार असले मुळे सरपंच पदाचा दावेदार कोण ठरणार या कडे मात्र सर्वांचे लक्ष लागगुण राहिले आहे.

.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button