आखाडा विधानसभेचा……
प्रतिनिधी सलीम पिंजारी
जळगाव: रावेर यावल मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची चांगलीच भाऊगर्दी रंगलेली असतांनाच काल अचानक नविन नाव चर्चेत आलं.विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे, उद्योजक श्रीराम पाटील, डॉ.कुंदन फेगडे,यांच्यासह जवळपास १५ इच्छुकांनी भारतीय जनता पक्षाचे इच्छुक अर्ज भरले असतांना आज अचानक नविन वळण मिळाले.फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती गृप च्या अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी भाजपातर्फे इच्छुक म्हणून अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रावेर यावल मतदारसंघात नवीन चेहर्याला संधी मिळणार असल्याचे बर्याच दिवसांपासून बोलले जात होते.त्यातच रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाने विविध चर्चांना उधाण आलं होतं.विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे यांची पक्षाने कृषी संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केल्याने त्यांना मंत्रीपदाचा दर्जा मिळाला असून रावेर मतदारसंघात त्यांच्या जागी भाजपातर्फे नविन व युवा चेहर्राचा शोध घेतला जात असल्याचे देखील बोलले जात होते.
खान्देश नारीशक्ती गृपच्या माध्यमातून फैजपूर सह यावल रावेर परिसरात सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी गेल्या दोन वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले असून त्यामाध्यमातून त्या सतत मतदारांच्या संपर्कात आहेत.त्यांनी गेल्या महिन्यात बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी कामगार आयुक्तांच्या कार्यालयात केलेल्या घेराव व ठिय्या आंदोलनामुळे कामगारांच्या समस्यांची दखल घेत मंत्रीमंळाने तालुकास्तरावर नोंदणी अधिकारी नियुक्त केले. तसेच भाजपाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये देखील सौ.चौधरी या सक्रीय असून उच्चशिक्षण,तरुण चेहरा व जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना जास्तीत जास्त संधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे त्यानूसार आजपर्यंत कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर ७० पेक्षा जास्त महिला खासदार लोकसभेत निवडून आलेल्या आहे.त्यानूसार पक्षाने विचार केल्यास सौ.दिपाली चौधरी यांना उमेदवारी मिळू शकते असं बोललं जात आहे.
ऐनवेळी सौ.दिपाली चौधरी यांचे नाव चर्चेत आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.इतर इच्छुक पहिल्या दिवसापासून मुलाखती देउन तयारीला लागले असताना सौ.दिपाली यांनी अचानक कसा पक्षाकडे इच्छुक अर्ज केला? असा प्रश्न सर्व निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पडला असल्याचे बोलले जात आहे.







